covid 19 covid 19
छत्रपती संभाजीनगर

धक्कादायक! औरंगाबाद शहरात पावणेदोन लाख कोरोना चाचण्यांचा घोळ

साडेआठ लाख चाचण्या, पाच लाख ८९ हजार निगेटिव्ह.

माधव इतबारे

औरंगाबाद: कोरोना संसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत महापालिकेने शहरातील तब्बल आठ लाख ५५ हजार ६०१ जणांच्या कोरोना चाचण्या केल्या आहेत. यातील पाच लाख ८९ हजार ३७७ चाचण्या निगेटिव्ह आल्या असून, ९१ हजार १२४ जण पॉझिटिव्ह आले. मात्र एक लाख ७५ हजार १०० चाचण्यांचे काय झाले हा प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. यासंदर्भातील घोळ दोन दिवसात संपविण्यात येईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

शहरात मार्च २०२० पासून कोरोना संसर्ग सुरू झाला. गेल्या १५ महिन्यात संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात ॲन्टीजेन व आरटीपीसीआर पद्धतीच्या चाचण्या केल्या. दुसऱ्या लाटेत संसर्ग वाढल्याने दररोज चार ते पाच हजारांपर्यंत चाचण्या केल्या जात होत्या. महापालिकेने मंगळवारी (ता.२९) दिलेल्या अहवालानुसार आत्तापर्यंत एकूण आठ लाख ५५ हजार ६०१ कोरोना चाचण्या केल्या आहेत. त्यापैकी पाच लाख ८९ हजार ३७७ निगेटिव्ह तर ९१ हजार १२४ पॉझिटिव्ह अहवाल आले. मात्र एक लाख ७५ हजार १०० चाचण्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले की निगेटिव्ह? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात विचारणा केली असता महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा जोगदंड यांनी सांगितले की, आकडेवारीत काही तरी गोंधळ झाला आहे. दोन दिवसांत त्यात दुरूस्ती केली जाईल.

आत्तापर्यंतच्या झालेल्या चाचण्या (ता. २९)
एकूण चाचण्या : ८,५५,६०१
निगेटिव्ह चाचण्या : ५,८९,३७७
पॉझिटिव्ह रिपोर्ट : ९१,१२४
बाहेरील पॉझिटिव्ह : ४,१३५
शहरातील पॉझिटिव्ह : ८६,९८९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT