10 th exam 
छत्रपती संभाजीनगर

दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेबाबत संभ्रम कायम; प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्र कधी येणार?

संदीप लांडगे

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, अद्याप प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. त्यामुळे प्रात्यक्षिक परीक्षा नेमक्या केव्हा होतील? याबाबत विद्यार्थ्यामध्ये संभ्रम आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाजन्य परीस्थिती आहे. अशातच महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सध्या दहावी-बारावीचे वर्ग भरत असले तरी फक्त ५० टक्के विद्यार्थी उपस्थित रहात आहे. तसेच वर्गामध्येही फक्त तीनच तास होत असल्यामुळे आभ्यासक्रम पुर्ण करण्याचे आव्हान शाळांवर आहे.

अनेक विद्यार्थी कोरोनामुळे अद्याप शाळेत आलेले नाहीत. ऑलाईन शिक्षणातही अनेक अडचणी आहेत. विज्ञान विषयातील कपातीचा गोंधळ अद्याप कायम आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास पालकांकडून विरोध सुरु झाला आहे. परीक्षा तोंडावर आली असताना शाळांकडून प्रात्यक्षिक परीक्षेबाबत काहीच सांगण्यात येत नसल्याने विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.

विज्ञान आणि गणित विषयाची लेखी परीक्षा ८० गुण व प्रात्यक्षिक परीक्षा २० गुण असे मुल्यमापन केले जाते. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण कसे मिळतील. प्रात्यक्षिक परीक्षा कधी होईल. कोरोनामुळे मुले शाळेत येवू शकत नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचा सराव न करता प्रात्यक्षिक परीक्षा कशी द्यावी, याबाबत विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या मनामध्ये गोंधळाची स्थिती आहे. विषय शिक्षकानी ऑनलाईन विज्ञान विषयाच्या अध्यापनात प्रात्यक्षिकांचे सादरीकरण दाखवले तरी विद्यार्थ्यांना स्वतः प्रयोगशाळेत जावून प्रयोग करणे व प्रयोगवहीत नोंदी घेणे शक्य नाही.

गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय प्रत्यक्ष शिक्षकांच्या सानिध्यात आत्मसात करण्याचे विषय आहे. विद्यार्थ्यांना या विषयांचे यंदा प्रचंड दडपण असल्याचे विषय शिक्षकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagavi Water Crisis : पाणीटंचाईचं संकट! महाराष्ट्राकडून कर्नाटकला मिळणार का 2 TMC पाणी? मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवकुमार यांच्यात होणार महत्त्वाची चर्चा

Latest Marathi News Live Update : सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

Noorjahan Mango: आंब्यांची ‘राणी’ ठरली महागडी! ३.३ किलोच्या नूरजहाँ आंब्याला ३,८०० रुपयांची किंमत, मध्य प्रदेशातील दुर्मीळ आंब्यास परदेशातही मागणी

US Iran Peace Deal : मध्यपूर्वेत शांततेची नवी पहाट ! अमेरिका-इराणमध्ये ऐतिहासिक शांतता करार; युद्धाला पूर्णविराम, 'होर्मुझ' खुली होणार

Operation Tiger: एकनाथ शिंदेंचा प्लॅन बिघडला? दोन खासदारांच्या भूमिकेमुळे 'ऑपरेशन टायगर' अडचणीत, सस्पेन्स कायम!

SCROLL FOR NEXT