दोन कॉलम बातमी
आम्ही काँग्रेसमध्ये आहोत, पुढेही राहणार!
पाथरी येथील नगरसेविकांची पत्रकार परिषदेत स्पष्टोक्ती
पाथरी, ता. १७ (बातमीदार) ः काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याच्या आरोपानंतर मंगळवारी (ता. १७) काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगरसेविका अजिजाबी रशीद खान व मंगल राजेश पाटील यांनी आम्ही काँग्रेस मध्येच आहोत आणि राहणार असल्याचे स्पष्ट केले.
पाथरी नगर परिषदेतील राजकीय घडामोडींना मंगळवारी (ता. १७) नवे वळण मिळाले. काँग्रेसच्या १२ नगरसेवकांपैकी प्रभाग क्रमांक १० मधील मंगल राजेश पाटील यांचे पती आणि प्रभाग क्रमांक १ मधील अजीजाबी रशीद खान यांच्या मुलाने मंगळवारी मुंबई येथे आमदार सईद खान यांच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश केला होता. या प्रवेशामुळे पाथरी तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. १७) काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी दोन्ही नगरसेविकांनी आपण काँग्रेसमध्येच असल्याचे जाहीर केले. त्यामुळे मुंबईतील पक्षप्रवेशानंतर निर्माण झालेल्या राजकीय चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. ‘शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी राजीनामे दिल्यानंतर आमदार सईद खान यांनी काँग्रेसचे दोन कार्यकर्ते फोडून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना ते नगरसेवक असल्याचे सांगून सर्वकाही अलबेल असल्याचे दाखविण्यासाठी हे नाटक केले’, असा आरोप काँग्रेसचे नेते तारेख खान दुरानी यांनी केला. या पत्रकार परिषदेला तारेख खान दुरानी, हातिम अन्सारी, मिलिंद आठवले, काँग्रेसचे गटनेते मोहम्मद इब्राहिम अब्दुल रशीद, नगरसेवक अन्सारी इब्राहिम, अमीर बाबू, रंगनाथ विरकर, आशिफोद्दीन अन्सारी, कलीम अन्सारी, अब्दुल रजाक, मलिक पटेल, काँग्रेसचे शहराध्यक्ष दादाराव गवारे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.