Chhatrapati Sambhaji Nagar constrction Sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar : बांधकाम परवानगी महागणार; विकास शुल्कात दोन टक्के वाढ करण्याचा निर्णय

बांधकाम परवानगी घेणाऱ्यांना जास्तीचे शुल्क भरावे लागणार

सकाळ वृत्तसेवा

Chhatrapati Sambhaji Nagar : शहरात बांधकाम परवानगी महागणार आहे. वारसास्थळांच्या संवर्धनासाठी महापालिकेने हेरिटेज फंड उभारण्याचा निर्णय घेतला असून, सुरवातीला बांधकाम परवानगीतून महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नातून दोन टक्के निधी वेगळा केला जाईल,

असे सांगण्यात आले होते; पण आता विकास शुल्कात दोन टक्के वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे बांधकाम परवानगी घेणाऱ्यांना जास्तीचे शुल्क भरावे लागणार आहे.

छत्रपती संभाजीनगराला राज्याच्या पर्यटन राजधानीचा दर्जा आहे. शहराच्या विविध भागांत ऐतिहासिक वारसास्थळे असून या वारसास्थळांची दुरवस्था झाली आहे. त्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी हेरिटेज समितीची स्थापना करण्यात आली आहे.

हेरिटेज समिती सदस्यांच्या वारंवार बैठका होतात. निवृत्त न्यायमूर्ती या समितीचे सदस्य आहेत. बैठकीला महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त, शहर अभियंता व नगररचना विभागाच्या उपसंचालकांना निमंत्रित केले जाते. हेरिटेज समितीच्या बैठकीत वारसास्थळांचे संर्वधनासंदर्भात निधीवर चर्चा झाली.

त्याची दखल घेत प्रशासक जी. श्रीकांत यांनी हेरिटेज फंड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, बुधवारी (ता. सहा) स्मार्ट सिटी कार्यालयात यासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक झाली. हेरिटेज फंड उभारण्यासाठी विकास शुल्कात दोन टक्के वाढ करण्याचे आदेश प्रशासकांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. विकास शुल्क वाढणार असल्यामुळे बांधकाम परवानगी महागणार आहे.

एक हजार चौरस मीटरमागे वाढणार दीड हजार रुपये

महापालिका सध्या बांधकाम परवानगीसाठी १,३८१ रुपये प्रतिचौरस मीटर या दराने विकास शुल्क आकारते. त्यात दोन टक्के वाढ झाल्यास २८ रुपये प्रतिचौरस एका मीटरमागे वाढ होणार आहे. त्यानुसार १४०९ रुपये विकास शुल्क आकारले जाईल. साधारणतः एक हजार चौरस फुटांच्या प्लॉटसाठी सुमारे ४२ हजार रुपये विकास शुल्क आकारले जात होते, त्यात किमान दीड हजार रुपये वाढ होईल असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Red Alert : पुणे जिल्ह्याला आज 'रेड अलर्ट'; पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Farm Loan Waiver : अजितदादांच्या जयंतीचा मुहूर्त! 56 लाख शेतकऱ्यांना 37 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी; कर्जमुक्तीची पहिली यादी आज होणार प्रसिद्ध

Khadakwasla Dam Water Storage : पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार! पानशेत धरण 69 टक्के भरले; खडकवासला साखळीत 'इतके' टीएमसी पाणी जमा, पाहा पाण्याची स्थिती

CJP Protest : आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर; शरद  पवार, अरविंद केजरीवाल यांची उपस्थिती

CJP Protest: उद्धव ठाकरेंचा दिल्लीतून सत्ताबदलाचा नारा! 'सीजेपी'च्या आंदोलनाला दिली भेट, दीपकेंचं केलं कौतुक

SCROLL FOR NEXT