छत्रपती संभाजीनगर

दुष्काळात बांधकाम कामगारांना ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान द्या

CD
बांधकाम कामगारांना पाच हजार सानुग्रह अनुदान देण्याची मागणी ----------- छत्रपती संभाजीनगर, ता. २१ ः राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीमुळे इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील कामगारांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून, परिस्थिती सामान्य होईपर्यंत पात्र बांधकाम कामगारांना प्रतिमहा ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार महासंघाचे अध्यक्ष अमोल गायकवाड यांनी केली. या संदर्भातील निवेदन महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री आणि कामगार मंत्र्यांना देण्यात आले. निवेदनाचा आशय असा ः दुष्काळामुळे अनेक भागांतील बांधकामे ठप्प होत आहेत. बांधकाम कामगार हा पूर्णपणे रोजंदारीवर अवलंबून असतो. बांधकामे बंद पडल्यास थेट कामगारांसोबतच वाळू, विटा, स्टील, सिमेंट, मालवाहतूक आणि इतर पूरक क्षेत्रांशी निगडित असलेल्या हजारो कामगारांच्या हाताला काम उरणार नाही. परिणामी, त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ ओढवण्याची शक्यता असल्याने शासनाने सामाजिक बांधिलकीतून तत्काळ आर्थिक साहाय्य जाहीर करावे. - प्रमुख मागण्या राज्यातील सर्व पात्र नोंदणीकृत इमारत व इतर बांधकाम कामगारांना दुष्काळ संपेपर्यंत प्रतिमहा ५ हजार सानुग्रह अनुदान द्यावे. दुष्काळामुळे रोजगार गमावलेल्या कामगारांच्या कुटुंबांसाठी अतिरिक्त सामाजिक सुरक्षेच्या विशेष उपाययोजना राबवाव्यात. या योजनेबाबत तातडीने अधिकृत शासन निर्णय काढून त्याची पारदर्शक अंमलबजावणी सुरू करावी. १८ ऑक्टोबरपर्यंत शासनाने याबाबत ठोस व सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही निवेदनात देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘तुम्ही Gen Z नाही!’ दिल्ली हायकोर्टानं सौरभ दास अन् आशुतोष रांका यांना सुनावलं; फ्रान्समधील जाळपोळीच्या घटनांचाही केला उल्लेख...

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या घरातूनच SIR ला विरोध? २३ ऑक्टोबरला होणाऱ्या आंदोलनात पती परकला प्रभाकर होणार सहभागी

‘या घरात तुझ्या कार्यासाठी येईन असं वाटलं नव्हतं…’ नाना पाटेकरांच्या पुतण्याची पोस्ट चर्चेत; फार्म हाऊसमधील फोटो व्हायरल

Latest Marathi News Live Update : चार ते पाच महिन्यांत देशात काहीतरी मोठं घडणार, राज ठाकरेंचा दावा

Shark Tank USA: भारतीय तरुणाचा अमेरिकेत डंका! फक्त 2 चमच्यांच्या आयडियासाठी मिळाली ₹3.3 कोटींची ऑफर

SCROLL FOR NEXT