आडगाव जावळे (ता.पैठण, जि.औरंगाबाद) : अचानक आग लागून कंटेनर व त्यातील साहित्य जळून खाक झाले. (छायाचित्र : हबीबखान पठाण, पाचोड) Aurangabad News  esakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर थरार,धावत्या कंटेनरला अचानक लागली आग

औरंगाबादहून भरधाव वेगात मुरमुरे घेऊन बीडकडे जाणाऱ्या कंटेनरने अचानक पेट घेतला.

हबीबखान पठाण

पाचोड (जि.औरंगाबाद) : औरंगाबादहून (Aurangabad) भरधाव वेगात मुरमुरे घेऊन बीडकडे (Beed) जाणाऱ्या कंटेनरने अचानक पेट घेतला. यात कंटेनरसह मुरमुरे जळून खाक झाल्याची घटना बुधवारी (ता१३) पहाटे दीड वाजेच्या सुमारास औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव जावळे (ता.पैठण) (Paithan) जवळ घडली असुन सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अधिक माहिती अशी, औरंगाबादहून मुरमुरे घेऊन कंटेनर भरधाव वेगात बीडकडे जात असताना बुधवारी (ता.१३) पहाटे औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव (जावळे) जवळ अचानक त्याने पेट घेतला. कंटेनरमधून आगीचे लोण उठत असल्याचे चालकाला आरशात दिसताच चालकाने प्रंसगावधान राखत तातडीने बाहेर उडी घेत सोबतच्या क्लिनरला झोपेतून उठवत त्याला बाहेर पडण्यास सांगितले व कंटेनर मुख्य रस्त्याच्या बाजूला घेऊन चालकाने पाचोड पोलिसांसह अग्निशामक दलाला मोबाईलवरून माहीती दिली.

पहाटे पाच वाजेच्या सुमारास ग्रामस्थांना रस्त्यावर कंटेनर जळत असल्याचे दिसताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तोच औरंगाबाद येथील महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब व पाचोड पोलीस घटनास्थळी आले. तोपर्यंत कंटेनर व त्यातील मुरमुरे जळुन पूर्णतः जळुन खाक झाले. बऱ्याच प्रयत्नानंतर अग्निशामक दलास अधिकारी व कर्मचाऱ्यांना आग विझवण्यास यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने चालकाने सुटकेचा निःश्वास घेतला. या घटनेची पाचोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संतोष चव्हाण करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT