छत्रपती संभाजीनगर

न्यायालयाचा अवमान म्हणजे काय?

CD
((((कायद्याची भाषा)))) न्यायालयाचा अवमान म्हणजे काय? ------ न्यायालयाचा अवमान (Contempt of Court) ही न्यायव्यवस्थेच्या अधिकाराचे आणि न्यायदानाच्या प्रक्रियेचे संरक्षण करणारी कायदेशीर संकल्पना आहे. न्यायालयाच्या आदेशांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करणे किंवा न्यायदानाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करणारी कृती करणे, यामुळे न्यायालयाच्या अवमानाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. भारतात यासंदर्भात ‘न्यायालयाचा अवमान अधिनियम, १९७१’ लागू आहे. अवमानाचे दोन प्रकार न्यायालयाच्या अवमानाचे दिवाणी आणि फौजदारी असे दोन प्रमुख प्रकार आहेत. दिवाणी अवमान म्हणजे न्यायालयाच्या कोणत्याही निर्णयाचा, आदेशाचा, निर्देशाचा किंवा न्यायालयाला दिलेल्या हमीचा जाणीवपूर्वक भंग करणे. उदाहरणार्थ, न्यायालयाने एखाद्या बांधकामाला स्थगिती दिल्यानंतरही संबंधित व्यक्तीने जाणीवपूर्वक बांधकाम सुरू ठेवणे. फौजदारी अवमानामध्ये न्यायालयाची बदनामी करणारे किंवा न्यायालयीन कामकाजात अडथळा आणणारे कृत्य, न्यायप्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम करणारे प्रकाशन अथवा न्यायदानाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करणाऱ्या कृतींचा समावेश होऊ शकतो. मात्र, प्रत्येक टीका किंवा आरोप आपोआप अवमान ठरत नाही. त्यासाठी कायद्यातील निकष तपासले जातात. टीका आणि अवमान यांतील फरक न्यायालयाच्या निकालाशी असहमती व्यक्त करणे, कायदेशीर मुद्द्यांवर चर्चा करणे किंवा निर्णयाचे तर्कशुद्ध विश्लेषण करणे हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे. मात्र, टीकेच्या नावाखाली न्यायदानात अडथळा आणणे किंवा न्यायालयाच्या अधिकाराला बाधा पोचवणारे कृत्य करणे कायदेशीर कारवाईस कारणीभूत ठरू शकते. शिक्षेची तरतूद अधिनियमाच्या कलम १२ नुसार, न्यायालयाच्या अवमानासाठी कमाल सहा महिने साधा कारावास किंवा दोन हजार रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. योग्य प्रकरणात प्रामाणिक माफीनामा स्वीकारण्याची तरतूदही आहे. न्यायालयाचा अवमान रोखण्यामागील उद्देश टीकेला प्रतिबंध करणे नसून, न्यायदानाची प्रक्रिया निर्भयपणे आणि प्रभावीपणे सुरू राहावी हा आहे. न्यायालयावर टीका करणे म्हणजे अवमान नाही. - न्यायालयाच्या निकालावर कायदेशीर किंवा तर्कशुद्ध टीका करणे हा लोकशाहीतील अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे. - न्यायालयाच्या निर्णयाशी असहमती व्यक्त करणे म्हणजे आपोआप अवमान होत नाही. - न्यायालयाची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने केलेले खोटे आरोप किंवा न्यायदानात अडथळा आणणारे कृत्य परिस्थितीनुसार अवमान ठरू शकते. - न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे आवश्यक असते; मात्र अवमान ठरवताना आदेशाचे स्वरूप, पालन करण्याची क्षमता आणि उल्लंघन जाणीवपूर्वक झाले का, यांसारख्या बाबी महत्त्वाच्या ठरतात. -- अनिल जमधडे ९९२२०३४५००

Balewadi Fire : बालेवाडीत २२ व्या मजल्यावर भीषण आग; परिसरात खळबळ; कक्कड ला विदा इमारतीतील घटना, जीवित हानी टळली

Ranji Trophy 2026-27: बीडच्या ३ खेळाडूंची महाराष्ट्राच्या रणजी संघात निवड! मैदानात कधी उतरणार? जाणून घ्या...

Marathi News Live Updates : सोनम वांगचुक यांचा CJP आंदोलनाला पाठिंबा; नेत्यांच्या सुटकेसाठी उपोषणाचा इशारा

Congress High Command Alert : काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय! सर्व आमदार-खासदारांना तातडीने दिल्लीला बोलावले...

Reliance Jio: भारतात येणार 6G नेटवर्क! इंटरनेटसंबंधी 'रिलायन्स जिओ'चं मोठं अपडेट; पाचपट वेगवान कनेक्टिव्हिटी मिळणार

SCROLL FOR NEXT