Wet Drought 
छत्रपती संभाजीनगर

सततच्या पावसाने ओल्या दुष्काळाची स्थिती, औरंगाबाद जिल्ह्यातील महालगावात पिकांचे नुकसान

कमलाकर रासने

महालगाव (जि.औरंगाबाद) : महालगावसह (ता.वैजापूर) परिसरात पावसाळ्याच्या सुरवातीला वेळेवर जून महिन्यात पावसाचे आगमन दमदार झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पिकच्या पेरण्या ८० टक्के पूर्ण झाल्या. परंतु पुढचे सर्वच नक्षत्रचा पाऊस जोरदार पडत राहिल्याने ओढे नाले खळखळुन वाहुन धरणाच्या पाणीपातळीत वाढ होऊन विहीरी तुडुंब भरल्या आहे.

पाणीपातळी जमिनीबरोबर आल्याने बोअरवेलमधून पाणी वाहत असल्याचे चित्र महालगाव, भगुरसह परिसरात बघायला मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून जमिनी उपळा झाल्याने कपाशी पिवळी पडुन बाजरी, ऊस, मूगच्या शेंगाला मोड फुटले. भुईमुगाची नुसती वाढ झाली असून शेंगांचे प्रमाण कमी आहे. तूर, मका तसेच सततच्या पावसाने सचिन थोरात यांच्या कांदा चाळीला पाणी लागल्याने तीनशे क्विंटल कांदा चाळीत सडल्याने मोठे नुकसान झाले. फळबागामध्ये पपाई, डाळिंब व महेंद्र शेळके यांच्या पेरुच्या झाडाला फळधारणाच झाली नसल्याने बागाचे नुकसान झाले आहे. अशीच परिस्थिती काही दिवस राहिल्यास जमिनीतला ओलावा कमी होत नसल्याने पिके पिवळी पडुन पिके हातची जाती की काय अशी चिंता शेतकऱ्‍यांना पडली आहे.

पावसाने जून महिन्यातच सरासरी ओलंडली आहे.जुलै महिन्यात मध्ये ३६९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ता. ३० जुलै रोजी येथील सर्व शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे. यासाठी तहसीलदार निखिल धुरळकर यांना भगूर येथील शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे. रविवारी(ता.सहा) सायंकाळी पाचच्या सुमारास सुसाट्याच्या वाऱ्‍यासह पावसाने दमदार हजेरी लावली. यात ज्ञानेश्वर झिंजुर्डे, दादा काळे यांचे ऊस पिक खाली पडुन नुकसान झाले, तर येडु बनकर यांची बाजरी आडवी होऊन नुकसान झाले आहे. सर्वांत जास्त फटका महालगाव, भगूर, एकोडी सागज या गावांना बसला आहे. रविवारी ४२ मिमि पावसाची नोंद झाली आहे.


(संपादन - गणेश पिटेकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT