Teachers Recruitment sakal
छत्रपती संभाजीनगर

Teacher Recruitment : कंत्राटी शिक्षक भरतीचा संभ्रम दूर...नियमावली जाहीर :निवड प्रक्रियेबाबत शिक्षण आयुक्तांच्या सूचना

Teacher Recruitment : महाराष्ट्रातील दहा किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेची स्पष्टता करण्यात आली आहे. स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देऊन शिक्षक पदे भरली जाणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील दहा आणि त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने डी.एड., बी.एड पात्रताधारक उमेदवाराची निवड केली जाणार आहे. या निवड प्रक्रियेबाबत सविस्तर सूचना शिक्षण आयुक्तांनी दिल्या आहेत.

२०२३-२४ च्या संचमान्यतेनुसार दहा किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेत दोन शिक्षक कार्यरत असल्यास एका शिक्षकाचे प्रचलित कार्यपद्धतीने समायोजन झाल्यावर प्रत्यक्ष पद रिक्त झाल्यानंतरच संबंधित शाळेत दुसरा शिक्षक कंत्राटी पद्धतीने नियुक्त करावा.

शासन आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याशी करारनामा करणे आवश्यक राहील. तसेच महापालिका व्यवस्थापनाच्या बाबतीत संबंधित महापालिकेच्या शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांच्याशी, तर नगरपालिका व्यवस्थापनाच्या बाबतीत संबंधित मुख्याधिकारी यांच्याशी करारनामा करणे आवश्यक राहील, असे नमूद करण्यात आले आहे.

पेसा क्षेत्रातील नियुक्तीबाबत

ग्रामविकास विभागाच्या ५ ऑक्टोबरच्या शासन आदेशानुसार पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात स्थानिक अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी निवड प्रक्रिया झालेल्या उमेदवारांना मानधन तत्त्वावर नियुक्ती देण्याचे निर्देश आहेत.

उमेदवारांना शक्यतो दहापेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावे. निवड केलेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यास दहा पटसंख्येपेक्षा अधिक शाळांमध्ये पद रिक्त नसल्यास दहा किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेत नियुक्ती देता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

हे आहेत निकष...

  • या निवड प्रक्रियेत ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी असावा.

  • स्थानिक उमेदवारांचे एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास अधिक गुण असलेल्या उमेदवाराचा विचार करावा.

  • अधिकच्या पात्रता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवाराला प्राधान्य द्यावे.

  • रिक्त पद असलेल्या शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवारांचे अर्ज न आल्यास संबंधित तालुक्यातील अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा विचार करावा.

  • तालुक्यातूनही उमेदवार उपलब्ध होत नसल्यास जिल्ह्यातील उमेदवाराचा विचार करावा.

  • समान गुण असल्यास अधिक शैक्षणिक, व्यावसायिक पात्रताधारक उमेदवाराला प्राधान्य द्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT