छत्रपती संभाजीनगर

सणासुदीच्या तोंडावर २१०० कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ!

CD
ऐन सणासुदीत २,१०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी ---- दोन महिन्यांचे वेतन थकले; महापालिका-ठेकेदारात नाही समन्वय ---- सकाळ वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर, ता. १९ : महापालिकेच्या विविध विभागांत काम करणाऱ्या २,१०० कंत्राटी कर्मचाऱ्यांवर ऐन सणासुदीच्या दिवसांत आर्थिक संकट ओढवले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. महापालिकेतील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी सध्या २,१०० कर्मचारी कंत्राटी पद्धतीने विविध विभागांत कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या पुरवठ्यासाठी आणि वेतनासाठी महापालिकेने चार वेगवेगळ्या एजन्सींची (कंत्राटदार) नेमणूक केली. मात्र, महापालिकेकडून बिल मिळाले नसल्याचे कारण पुढे करत एजन्सींनी कर्मचाऱ्यांच्या वेतनाकडे पाठ फिरवली आहे. विशेष म्हणजे, महापालिकेने बिल दिले नाही तरीही दरमहा ७ तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वेतन जमा करणे प्रत्येक एजन्सीला बंधनकारक आहे. असे असतानाही, ठेकेदार आणि प्रशासनातील समन्वयाचा अभाव व ढिसाळ कारभार यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळणे सलग दुसऱ्या-तिसऱ्या महिन्यातही दुरापास्त झाले आहे. सध्या गणेशोत्सव आणि पाठोपाठ येणाऱ्या सणांमुळे खर्च वाढला आहे. त्यातच सलग दोन महिने वेतन न मिळाल्यामुळे घरभाडे कसे द्यायचे, किराणा कसा आणायचा, मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा आणि सण कसे साजरे करायचे, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित ठेकेदारांना जाब विचारावा आणि कर्मचाऱ्यांचे सर्व थकीत वेतन तत्काळ त्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी होत आहे. --- (((कोट))) एजन्सीने सादर केलेल्या बिलांची तपासणी करून देयक अदा करण्याची प्रक्रिया नियमितपणे सुरू असते. ही प्रक्रिया सुरू असली तरी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या ठरलेल्या तारखेलाच करणे संबंधित एजन्सीला बंधनकारक आहे. - विकास नवाळे, उपायुक्त, कामगार विभाग

Pune Accident: ससूनमधून परतले, जेवणासाठी महामार्गावर उतरले; काही क्षणांतच सहाय्यक फौजदारावर काळाचा घाला, अज्ञात वाहनाची धडक अन्..

Latest Marathi News Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल

मामा-भाच्यात असं काय घडलं? राजगुरूनगरमध्ये धक्कादायक घटना |

Rohit Sharma: वडापाव नाही, तर टेन्शनच्या वेळी आईच्या हातचा 'हा' पदार्थ आहे कम्फर्ट फूड; रोहितने केला खुलासा

Satara Accident News: ४६ दिवस मृत्यूशी झुंज; बंगळूर महामार्गावरील अपघातात गंभीर जखमी प्रतीक काळभोरचा अखेर मृत्यू, एकुलता एक मुलगा गमावला

SCROLL FOR NEXT