bamu bamu
छत्रपती संभाजीनगर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ शुक्रवारी

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अनिल सहस्रबुद्धे हे दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे आहेत

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: ६१ वा दीक्षांत समारंभ शुक्रवारी (ता.२५) ऑनलाइन होणार आहे. कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या अध्यक्षतेखाली दीक्षांत समारंभ होईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी मंगळवारी (ता.२२) पत्रकार परिषदेत दिली. डॉ. येवले म्हणाले, यंदा राज्यातील सर्वच विद्यापीठांचे दीक्षांत समारंभ ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे निर्देश आहेत.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अनिल सहस्रबुद्धे हे दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे आहेत. महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यासह सर्व अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठ नाट्यगृहात सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारादरम्यान समारंभ होईल. यावेळी पीएच.डी. मंचावर संशोधकांच्या पीएच.डी. चे वितरण प्रत्यक्ष न घेता ऑनलाइन पद्धतीने नाववाचन होईल. (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University convocation ceremony)

समारंभात ४२७ संशोधकांना पीएच.डी. प्रदान करण्यात येईल. या कार्यक्रमात एकूण ८१ हजार ७३६ पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात येईल. पत्रकार परिषदेस प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांच्यासह प्रसिद्धी समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर, डॉ. कैलास अंभुरे, प्रा. पराग हासे, संजय शिंदे आदींची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT