Corona Patients Sakal
छत्रपती संभाजीनगर

Marathwada Corona update : कोरोनाने ३ हजार ६०० बाधित

मराठवाड्यात उपचारादरम्यान सहा जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाड्यात (marathwada)गुरुवारी (ता. २०) दिवसभरात कोरोनाचे ३ हजार ६०२ रुग्ण आढळले.(marathwada corona update) त्यात औरंगाबादेत सलग दुसऱ्या दिवशी अकराशेच्या आसपास बाधित समोर आले आहेत. नांदेड-लातुरमध्येही रुग्णवाढ सुरूच आहे. दरम्यान, औरंगाबादेत तीन, लातुरला दोन तर नांदेडला एकाचा मृत्यू झाला.औरंगाबाद जिल्ह्यात १०८९ कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यात महापालिका हद्दीतील ७३४ तर ग्रामीण भागातील ३५५ जणांचा समावेश आहे. रुग्णसंख्या एक लाख ५७ हजार ७९२ वर पोचली आहे. आणखी ३८१ रुग्ण बरे झाले. आजपर्यंत एक लाख ४८ हजार ४१२ रुग्ण बरे झाले आहेत. ५०१२ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.(third wave of corona)

देवगिरी कॉलनीतील (क्रांती चौक) पुरुष (वय ५८), रोहिल गल्लीतील पुरुष (६२), पन्नालालनगरातील पुरुषाचा (५६) उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत तीन हजार ६६८ जणांचा मृत्यू झाला आहे.नांदेडला ७२० बाधित नांदेड जिल्ह्यात ७२० कोरोनाबाधित आढळले. रुग्णसंख्या ९६ हजार १३३ असून ८९ हजार ९०१ रुग्ण बरे झाले आहेत.सध्या तीन हजार ५७५ जणांवर उपचार सुरू आहेत. हिंगोली जिल्ह्यातील ८४ वर्षीय महिलेचा काल येथे मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार ६५७ जणांचा मृत्यू झाला आहे.

हिंगोलीत १५५ रुग्ण

हिंगोली जिल्ह्यात १५५ रुग्ण दाखल झाले. रुग्णसंख्या १६ हजार ७८३ असून १५ हजार ८४४ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ५४३ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३९६ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यात २३२ रुग्ण आढळले.

लातुरमध्ये ६३३ बाधित

लातूर जिल्ह्यात कोरोनाचे ६३३ रुग्ण आढळले. बुधवारी (ता. १९) एक हजार ३६ आरटीपीसीआर चाचण्यांतून ३६३ तर एक हजार ३३१ ॲँटीजेन चाचण्यांतून २७० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. रुग्णसंख्या ९८ हजार २२० वर पोचली असून ९२ हजार १५५ रुग्ण बरे झाले आहेत. तीन हजार ६०८ जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, दोघांचा मृत्यू झाला. आतापर्यंत दोन हजार ४५७ जणांचा मृत्यू झाला आहे.

जालन्यात २२४ रुग्ण

जालना जिल्ह्यात २२४ कोरोना रूग्ण(corona patients) आढळले. त्यात जालना शहरातील १७३ जण आहेत. रुग्णसंख्या ६३ हजार ६९७ असून ६१ हजार ३३१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या एक हजार १६२ जणांवर उपचार (corona treatment)सुरू आहेत. आतापर्यंत एक हजार २०४ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT