चीनमधून परतला, अन्‌ त्याला भरली कोरोनाची धडकी!
चीनमधून परतला, अन्‌ त्याला भरली कोरोनाची धडकी! 
छत्रपती संभाजीनगर

कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी चाचण्या सुरुच

मधुकर कांबळे

शहरभर बेड्स मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना भटकंती करण्याची वेळ आली होती. तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणा वाढत्या रुग्णांना सेवा देण्यात अपुरी पडत होती.

औरंगाबाद : कोरोना Corona महामारीची दुसरी लाट आता ओसरत आहे. शनिवारी (ता.१२) शहरात फक्त १५ रुग्ण आढळले. तरीपण प्रशासनाकडून तिसरी लाट थोपवण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून चाचण्या सुरूच ठेवण्यात आल्या आहेत. विविध पथके व आरोग्य केद्रांच्या माध्यमातून रोज तीन ते साडेतीन हजार चाचण्या केल्या जात आहेत. पहिल्यापेक्षा दुसऱ्या लाटेने मार्च आणि एप्रिल महिन्यात लोकांना आणि यंत्रणेला चांगलेच जेरीस आणले. रोज हजार ते दीड हजार रुग्ण नव्याने आढळत असल्याने शहरात रुग्णांसाठी बेड्स पुरेनासे झाले. शहरभर बेड्स मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना भटकंती करण्याची वेळ आली होती. तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणा वाढत्या रुग्णांना सेवा देण्यात अपुरी पडत होती. या परिस्थितीतही प्रशासनाने संयमाने कोरोना चाचण्या वाढवत विविध उपाययोजना प्रभावीपणे राबवल्या. परिणामी, मे महिन्यापासून शहरासह जिल्ह्यातील रुग्ण कमी होण्यास सुरूवात झाली आहे. औरंगाबाद Aurangabad शहरात शनिवारी फक्त १५ बाधित रुग्ण आढळले. शनिवारी दिवसभरात महपालिकेची Aurangabad Municipal Corporation मोबाइल पथके, सिटी एन्ट्री पॉइंट, आरोग्य केंद्रे, प्रशासकीय कार्यालये व विमानतळ आणि रेल्वेस्टेशन या सर्व ठिकाणी ३ हजार ६९३ कोरोना चाचण्या Corona Test करण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची संख्या शहरात घटत असली तरी महापालिका प्रशासनाकडून खबरदारी म्हणून नियमितपणे रोज तीन ते साडेतीन हजार नागरिकांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. जुलैनंतर आरोग्य तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. ही लाट आधीच्या दोन्हीपेक्षा अधिक घातक ठरू शकते, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे तिसरी लाट येऊ न देण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण कायम ठेवण्यात आल्याचे मानले जात आहे.Corona Continue For Preventing Third Wave In Aurangabad

रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांवर

शनिवारपर्यंत शहरात ११४ बाधितांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहे. यापैकी २२ रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. तर सर्वाधिक २६ रुग्ण मेल्ट्रॉनमध्ये दाखल आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरात मृत्युचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे रिकव्हरी रेट अर्थातच रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे ७८ टक्क्यांपर्यंत खाली गेले होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणा चिंतेत पडली होती. मात्र, गेल्या महिनाभरात रुग्णसंख्या कमी झाली. त्याबरोबरच रिकव्हरी रेटमध्येही सुधारणा झाल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. महापालिकेच्या अहवालानुसार शहरी भागातील शनिवारचा रिकव्हरी रेट ९७.६५ टक्के एवढा नोंदविला गेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT: सीएसएमटी स्थानकात लोकल रुळावरुन घसरली; सलग दुसरी घटना घडल्यानं खळबळ

Shashi Tharoor T20 WC 2024 : माझा मतदारसंघ करणार वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व.... शशी थरूर भारतीय संघाची घोषणा होताच हे काय म्हणाले?

Poorest Politicians: भारतातील सर्वात गरीब 'पुढारी' कोण आहेत? ज्यांच्याकडे आहे फक्त 1,700 रुपयांची मालमत्ता

Latest Marathi News Live Update: उद्धव ठाकरेंची विकेट आधीच पडलीए, ते क्लीनबोल्ड झालेत; CM शिंदेंना विश्वास

Rupali Ganguly: वेट्रेस म्हणून केलं काम, गाजवला छोटा पडदा अन् आता भाजपमध्ये प्रवेश; जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल

SCROLL FOR NEXT