corona
corona 
छत्रपती संभाजीनगर

सावधान... कोरोनाचा बालकांना पडतोय विळखा 

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोनाग्रस्तांमध्ये सर्वाधिक प्रमाण तरुणांचे तर बालकांचे प्रमाण सर्वांत कमी होते. मात्र, आता कोरोनाबाधित बालकांचे प्रमाण वाढत आहे. दोन टक्क्यांवरून हे प्रमाण २.९ टक्क्यापर्यंत गेले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, ५० वर्षांवरील नागरिकांचे बळी सुरूच आहेत. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेतर्फे केले जाणारे प्रयत्न अपुरे पडत आहेत. त्यामुळे रोज नवनवीन वसाहतींत कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. कोरोनाबाधित ५० वर्षांवरील नागरिकांचे प्रमाणही अद्याप कमी झालेले नाही. त्यात आता बालकांची भर पडत आहे. महिनाभरापूर्वी बालकांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण हे दोन टक्के होते. आता २.९ टक्के झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण २८ टक्क्यांवर आहे. केवळ एक टक्क्याने घसरण झाली आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महापालिकेच्या गुरुवारच्या (ता. दोन) अहवालानुसार शहरात चार हजार ७५८ रुग्ण आढळले. त्यात नऊ बालके आहेत. शून्य ते पाच वर्षे वयोगटांतील रुग्णांची संख्या १४० झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांची रुग्णांची संख्या एक हजार ३३९ एवढी आहे. १८ ते ५० वयोगटांतील बाधित नागरिकांची संख्या २,७४२ एवढी असून, हे प्रमाण ५७.९ टक्के एवढे आहे. ५ ते १८ वयोगटांतील बालकांची संख्या ५३७ असून, हे प्रमाण ११ टक्के आहे. 

मृत्युदर चिंताजनक 
जिल्ह्यापेक्षा शहरात कोरोनाचा मृत्युदर हा चिंताजनकच आहे. शहराचा मृत्युदर हा ५.३ टक्के एवढा असल्याचे गुरुवारच्या अहवालात नमूद आहे. शुक्रवारी (ता. तीन) प्राप्त अहवालात जिल्ह्याचा मृत्युदर ४.४ टक्के एवढा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 


‘सारी’ची रुग्णसंख्या घटली 
कोरोना विषाणूसोबत ‘सारी’चे (सिव्हिअरली अॅक्युट रेस्परेटरी इलनेस) रुग्ण झपाट्याने वाढत होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होत असल्याने महापालिकेला दिलासा मिळाला आहे. चार दिवसांत केवळ १५ रुग्ण आढळले आहेत. यातील सहाजण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. २९ जूनला ‘सारी’चा एकही रुग्ण आढळला नव्हता. ३० जूनला केवळ एकच रुग्ण आढळला. एक जुलैला ९ रुग्ण आढळले. त्यापैकी पाचजणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. दोन जुलैला पाच रुग्ण आढळले. त्यापैकी एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. ‘सारी’च्या एकूण रुग्णांची संख्या ७६९ एवढी झाली आहे. त्यापैकी ७६६ रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. २५४ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले, तर ५०६ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले.  

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

छत्रपतीनगर, कोहिनूर कॉलनीत सापडले कोरोना बाधित रुग्ण 
कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच असून, शुक्रवारी (ता. तीन) सातारा परिसर पाच, छत्रपतीनगर सात, कोहिनूर कॉलनीत चार, गारखेडा परिसरातील लक्ष्मीनगर येथे चार, सिडको एन-सहामधील संभाजी कॉलनीत पाच, जयभवानीनगरात सात, एकतानगरात चार, हनुमानगरात दहा, खोकडपूरा येथे चार, शिवाजीनगर येथे तीन बाधित रुग्ण आढळून आले आहे. अहवाल पॉझिटिव्ह येताच या भागात महापालिकेने जंतूनाशक फवारणी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT