pabal 
छत्रपती संभाजीनगर

बीड जिल्ह्यात कोविड सेंटरमधून २२ रुग्णांनी काढला पळ

चंद्रकांत राजहंस

शिरूर कासारला शासकीय वसतिगृह येथे कोविड सेंटर आहे. सौम्य लक्षण असलेली किंवा फार त्रास नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना या ठिकाणी ठेवून उपचार केले जातात.

बीड : शिरुर कासार (Shirur Kasar) येथील शासकीय वसतिगृहात उभारलेल्या कोविड केअर केंद्रामधून (Covid Care Centre) सौम्य लक्षणे असलेल्या २२ रुग्णांनी पळ काढल्‍याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे. अर्धवट उपचार सोडून पळणाऱ्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला. मात्र (Corona) रुग्ण निघून जात असताना यंत्रणेतील कर्मचारी नेमके काय करत होते. त्यांच्या हलगर्जीपणाविरुद्ध काय कारवाई करणार, हे पाहावे लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात (Beed) शंभरांवर शासकीय व लोकसहभागातील कोविड केअर केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. तालुका पातळींवर शासकीय वसतिगृहांत तसेच इतर ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. (Corona Patients Ran Away From Covid Care Centre In Beed District)

शिरूर कासारला शासकीय वसतिगृह येथे कोविड सेंटर आहे. सौम्य लक्षण असलेली किंवा फार त्रास नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना या ठिकाणी ठेवून उपचार केले जातात. ता.१४ ते २१ मे या सात दिवसांत या केंद्रामधून तब्बल 22 बाधित रुग्णांनी पळ काढल्याचे समोर आले आहे. शिरूर कासार, बावी, आनंदगाव, घोगस पारगाव, पौंडुळ, जांब, मानूर, हिवरसिंगा, झापेवाडी, दगडवाडी, नारायणवाडी या गावातील हे रुग्ण आहेत. त्यांनी उपचार अर्धवट सोडून पळ काढला आहे. सात दिवसांच्‍या कालावधीत एकेक, दोन-दोन रुग्ण निघून जात असताना आरोग्य विभागाची यंत्रणा काय करत होती, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरुन शिरुर कासार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup : अहमदाबाद में जितना जरूरी था, आपको तो पता ही हैं! सूर्यकुमार यादव मुंबईत येताच काय म्हणाला बघा Video Viral

Mumbai Weather: कोकण-मुंबई पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट, वातावरण कसं राहणार? हवामान तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Umarga Accident : हॉटेलमध्ये कार घूसल्याने दोघांचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी, उमरगा शहराजवळ झाला अपघात

मुंबईला ये... नाना पाटेकरांमुळे इंडस्ट्रीमध्ये आले मकरंद अनासपुरे; जुनी आठवण सांगत म्हणाले- त्या दिवशी...

Suryakumar Yadav: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी MS Dhoni ला कॉल; सूर्याने सांगितला, 'कॅप्टन कूल'चा सल्ला कसा कामी आला

SCROLL FOR NEXT