corona corona
छत्रपती संभाजीनगर

कोरोना चाचण्यांची संख्या निम्म्यावर, महापालिकेच्या केंद्रांवर शुकशुकाट

गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या २० च्या खाली आली आहे. त्यामुळे चाचण्यांची संख्या देखील घटली आहे.

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असल्याने दुसरीकडे चाचण्या देखील निम्‍म्यावर आल्या आहेत. दुसऱ्या लाटेत सरासरी चार ते पाच हजार ॲन्टीजेन व आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात होत्या मात्र ही संख्या आता एक ते दीड हजाराच्या दरम्यान आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. एखाद्या घरातील सदस्य पॉझिटिव्ह येताच कुटुंबातील सर्वच जण चाचण्या करून घेत होते. त्यामुळे महापालिकेच्या चाचणी केंद्रांवर दिवसभर रांगा दिसून येत होत्या. मात्र सध्या या केंद्रावर शुकशुकाट आहे.

गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या २० च्या खाली आली आहे. त्यामुळे चाचण्यांची संख्या देखील घटली आहे. रोजच्या सरासरी एक ते दीड हजार चाचण्या केल्या जात आहेत. रविवारी (ता. चार) तर ७१७ एवढ्या कमी चाचण्या करण्यात आल्या. मंगळवारी (ता. सहा) १६५४ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. शहराच्या सहा एन्‍ट्री पॉइंट, नऊ सरकारी कार्यालये अशा ३८ केंद्रावर रोज चाचण्या केल्या जात आहेत. पण या सर्वच ठिकाणी चाचण्यांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे बोलले जात आहे.

शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटली आहे. एका रुग्णामागे सरासरी ३० ते ४० जणांची तपासणी केली जाते. सध्या दररोज १५ ते २० रुग्ण आढळून येत आहेत. त्यानुसार चारशे ते पाचशे चाचण्या होणे अपेक्षीत आहे. पण महापालिकेतर्फे दररोज दीड हजारांपेक्षा जास्त चाचण्या केल्या जात आहेत.
-डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT