corona update health vaccine Shortage of Covaxin corbevax
corona update health vaccine Shortage of Covaxin corbevax  sakal
छत्रपती संभाजीनगर

Corona Update : संसर्ग थांबेना अन् लस मिळेना!

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लसीकरणाची गती वाढविणे गरजेचे असताना केंद्र शासनाकडून लसीचा साठा मिळत नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

महापालिकेकडे सध्या कोव्हॅक्सिनच्या २६० लसी शिल्लक आहे, पण या लसींची मुदत ३१ मार्चला संपणार आहे तर कोव्हॅक्सीन, कार्बोव्हॅक्स लसींचा साठा शिल्लक नाही. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखणार कसा, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पहिल्या, दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येने लसीकरण करण्यात आले. त्यानंतर बूस्टर डोसलाही चांगला प्रतिसाद मिळाला, पण गेल्या काही महिन्यात कोरोना संसर्गाची लाट ओसरली व नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरविली. नागरिक लस घेण्यास उत्सुक नसल्याने महापालिकेने देखील लसींसदर्भात पाठपुरावा केला नाही.

मागील काही महिन्यांपासून लसींचा साठा मिळालेला नाही. राज्याच्या आरोग्य विभागाकडून ज्या जिल्हा परिषद व महापालिकेकडे लसींचा साठा शिल्लक होता तो ज्यांच्याकडे लसी नाहीत अशा जिल्हा परिषद व महापालिकांकडे वर्ग केला.

दरम्यान या लसी देखील संपल्या आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाकडून केंद्र सरकारकडे कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, कार्बोव्हॅक्स लसीचा साठा मिळावा म्हणून, पाठपुरावा सुरू आहे पण अद्याप लसीचा साठा मिळालेला नाही. त्यामुळे केंद्राकडून जेव्हा लसींचा साठा मिळेल तेव्हा लसी पाठविल्या जातील, असे महापालिकांना कळविण्यात आले आहे.

या संदर्भात महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले, की महापालिकेकडे कोव्हॅक्सिनच्या २६० लसी शिल्लक आहे. या लसींची मुदत ३१ मार्चला संपणार आहे. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव नवीन सोना यांच्या बैठकीत चर्चा झाली. लसीची मागणी नोंदविण्यात यावी अशी सूचना करण्यात आली.

शहरात तीन हजार ऑक्सिजन बेड

रुग्ण संख्या वाढत असल्याने महापालिकेने तयारी केली आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, महापालिका, खासगी रुग्णालयात आठ हजार १४१ बेड उपलब्ध आहे. त्यात ऑक्सिजनचे तीन हजार ३४४, आयसीयूचे ५४०, व्हेंन्टिलेटरच्या ४०२ बेडचा समावेश आहे. महापालिकेच्या मेल्ट्रॉन रुग्णालयात ३५५, पदमपूरा ईओसी १००, नेहरुनगर आरोग्य केंद्र १००, सिडको एन-८ आरोग्य केंद्रात ५० व एन-११ आरोग्य केंद्रात ऑक्सिजनचे ५० बेड उपलब्ध असल्याचे डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने दिल्लीला मिळवून दिलं पहिलं यश; सुनील नारायण स्वस्तात बाद

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT