corona vaccination corona vaccination
छत्रपती संभाजीनगर

Covid-19 vaccination: औरंगाबादेत दिवसभरात दहा हजार लसी संपल्या

दरम्यान १८०० लसींचा साठा शिल्लक असल्याने शहरातील सात केंद्रावर शुक्रवारी लसीकरण होणार आहे

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: शहरासाठी महापालिकेला गुरुवारी (ता. १५) प्राप्त झालेल्या १२ हजार कोविशिल्ड लसींपैकी १० हजार २०० लसी दिवसभरात संपल्या. त्यामुळे उर्वरित १८०० लसी शुक्रवारी (ता. १६) सात केंद्रावर लसीकरण केले जाणार आहे. शहरात गुरुवारी ३९ केंद्रावर लसीकरण करण्यात आले. त्यापैकी ३४ केंद्रावर दुसरा डोस तर पाच केंद्रावर पहिला डोस देण्यात आला.

त्यानुसार सकाळपासूनच नागरिकांनी कुपन घेण्यासाठी केंद्रावर रांगा लावल्या. प्रत्येक केंद्रावर दिडशे लसी देण्यात आल्या. कोविन अ‍ॅपव्दारे ऑनलाइन नोंदणी करून पाच केंद्रावर पहिला डोस घेण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे केंद्रावर गोंधळ उडाला नाही. दिवसभरात नऊ हजार ५०० नागरिकांनी दुसरा डोस घेतला तर ७०० जणांना पहिला डोस देण्यात आला.

दरम्यान १८०० लसींचा साठा शिल्लक असल्याने शहरातील सात केंद्रावर शुक्रवारी लसीकरण होणार आहे. पहिल्या डोससाठी सादातनगर आणि चेतनानगर आरोग्य केंद्रावर व्यवस्था करण्यात आली तर दुसऱ्या डोससाठी जवाहर कॉलनी, सिडको एन-८, सिडको एन-११, पुंडलीकनगर, बन्सीलालनगर या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EV कडे वाढता कल, पण सुरक्षिततेचा मोठा प्रश्न! दुर्घटनेनंतर मंत्र्यांचा इशारा; चार्जिंगला लावून झोपलेल्या कुटुंबातील 8 जण जिवंत जळाले

Latest Marathi News Live Update : लाकडाच्या मागणीत 50 टक्के वाढ

Tiger Hunting Video : मृत्यू समोर असताना मोर उडून गेला, पण वाघाच्या तावडीत 'त्या' हरणाच्या पिल्लाचा दुर्दैवी अंत झाला; जबड्यात धरलेली मान पाहून मन हेलावून जाईल!

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! आठवड्यात 6 हजारांची घसरण; आजचा 1 तोळ्याचा भाव किती?

Hockey World Cup चे बिगूल वाजले! भारत-पाकिस्तान संघात पुन्हा आमने-सामने; १६ संघांचे ग्रुप्स जाहीर

SCROLL FOR NEXT