corona corona
छत्रपती संभाजीनगर

कोरोना योद्ध्यांच्या मुलांचे शिक्षण थांबले, कोणी उधारही देईना

कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी व बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने सुमारे ७०० ते ८०० कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती केली आहे

माधव इतबारे

औरंगाबाद: कोरोना काळाच स्वतःच्या जिवाची, कुटुंबाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. पण ‘गरज सरो, वैद्य मरो’ अशी अवस्था या आरोग्य कर्मचाऱ्यांची झाली आहे. महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना पाच महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे सोमवारी (ता. २६) आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी महापालिकेत धाव घेत कैफियत मांडली. फीस न भरल्याने मुलांचे शिक्षण बंद झाले. जुनी उधारी बंद झाल्याने किराणा मिळणे बंद झाले, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काहींना यावेळी रडूही कोसळले.

कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी व बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने सुमारे ७०० ते ८०० कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती केली आहे. मात्र शासनाकडून निधी मिळत नसल्याने या कर्मचाऱ्यांचे पाच महिन्याचे वेतन थकले आहे. त्यामुळे हे कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कोरोना संकटाच्या काळात या कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. त्यांचे भरभरून कौतुक झाले. पण आता वेतनाविना परिचारिका, डाटा ऑपरेटर, डॉक्टर हतबल झाले आहेत. सोमवारी गेल्या पाच महिन्यांपासून वेतन नसल्याने काय हाल होत आहेत, याची कैफियत मांडण्यासाठी परिचारिका प्रशासकांना भेटण्यासाठी महापालिकेत आल्या होत्या. मात्र प्रशासकांची भेट झाली नाही. त्यामुळे त्यांनी अतिरिक्त आयुक्त बी. बी नेमाणे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चार-पाच दिवसात पगार झाला नाही तर आम्हांला काम बंद करावे लागेल. आमच्याकडे कामावर जाण्यासाठी देखील पैसे नसल्याचे परिचारिकांनी सांगितले.

महापालिकेत आल्याचा पश्चात्ताप
महापालिकेने सुमारे दीडशे परिचारिकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली आहे. या परिचारिकांना १७ ते २० हजार एवढा पगार दिला जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे खासगी रुग्णालयात कमी पगारावर काम करणाऱ्या अनेक परिचारिका महापालिकेत आल्या. पण पाच महिन्यांपासून वेतन नसल्याने त्यांच्यावर पश्चात्तापाची वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! लाडक्या बहिणींना १४ जानेवारीपूर्वी मिळणार ४५०० रुपये; नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यात जमा होणार, वाचा...

आजचे राशिभविष्य - 20 डिसेंबर 2025

Weekend Special Breakfast : वीकेंडला सकाळी नाश्त्यात बनवा खास पदार्थ, सर्वजण करतील कौतुक

राज्य सरकारचा मोठा निर्णय; विवाहासाठी ‘या’ जोडप्यांना मिळणार आता अडीच लाख रुपये; काय आहेत अटी, कागदपत्रे कोणती लागणार, अर्ज कोठे करायचा? वाचा...

IND vs SA, 5th T20I: तिलक वर्मा-शिवम दुबे एकाच दिशेला धावले, पण रनआऊट नेमकं झालं कोण? शेवटच्या चेंडूवर गोंधळ

SCROLL FOR NEXT