कामगार 
छत्रपती संभाजीनगर

धक्कादायक...या शहरात तयार होताहेत कोरोनाचे तीन हॉटस्पॉट

मनोज साखरे

औरंगाबाद - कोरोनाचा संसर्ग वाढतानाच कुटुंबातील रुग्णांची संख्याही लक्षणीय ठरत आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण आढळलेल्या १२ वसाहतींपैकी आरेफ कॉलनी, किराडपुरा, बायजीपुरा हे भाग अतिसंवेदनशील तयार होत असून, या भागांवर महापालिकेचे अधिक लक्ष असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी (ता.१६) सांगितले. तीन भाग असंवेदनशील महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी

तीन भाग अतिसंवदेनशील

सायंकाळी फेसबुक लाइव्ह पत्रपरिषदेद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी महापौरांनी सांगितले की, आजपर्यंत बारा वसाहतीत कोरोना रुग्ण आढळले. त्यापैकी आरेफ कॉलनी, किराडपुरा आणि बायजीपुरा हे तीन भाग अतिसंवदेनशील होताना दिसत आहे. येथे संपर्कातल्या संपर्कातून कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. कोरोनाच्या या वाढत्या संसर्गाला रोखण्याचे मोठे आव्हान महापालिकेचा आरोग्य विभाग व जिल्हा आरोग्य विभागासमोर आहे. पालिकेने या सर्व वसाहतील सील केल्या असून, येथे रोज पालिकेच्या आरोग्य पथकांकडून नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे असेही महापौरांनी सांगितले.

दिवसभरात काय झाले?

गुरुवारी येथे ११५ आरोग्य पथकांकडून सहा हजार ९१५ घरांचा सर्व्हे केला गेला. त्यात ३१ हजार ७३१ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. १४ दिवसांपेक्षा अधिक दिवस येथे आरोग्य तपासणी करणार. महापालिकेने शहरात १२ ठिकाणी फिव्हर क्लिनिक सुरू केले आहेत. १०७ रुग्णांची तपासणी कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्‍या सर्दी, ताप, खोकला या आजारांची येथे तपासणी केली जात आहे. बुधवारपर्यंत या सेंटर्समधून दोन दिवसांत २३३ रुग्णांची तपासणी झाली. त्यापैकी चार कोरोना संशयितांना पुढील तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. गुरुवारी दिवसभरात १०७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन कोरोना संशयितांना पुढील तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती महापौरांनी दिली.

एमजीएम येथे कोविड केअर सेंटर

एमजीएम रुग्णालयातर्फे एमजीएम परिसरातील स्पोर्टस् कॅम्पच्या इमारतीत कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. येथेही आता कोरोना संशयितांची तपासणी केली जात आहे. येथून स्वॅब कलेक्शन सुरू केले असून, गुरुवारी ३५ स्वॅब घेऊन घाटीकडे पाठविले आहे. यासाठी महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, आरोग्य अधिकारी डॉ. राठोडकर व यांची टीम परिश्रम घेत असल्याचे महापौर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT