Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत कोरोना कन्फर्म : ५९ वर्षीय महिलेवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : जगभर थैमान घालत असलेल्या कोरोना या आजाराचा औरंगाबाद शहरात पहिला रुग्ण आढळला आहे. रशिया, कझाकिस्तानातून प्रवास करून आलेल्या या महिलेला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत दिली आहे. 

पीटीआय या वृत्तसंस्थेनं यासंबंधीचं वृत्त जाहीर केलं आहे. आतापर्यंत भारतात या आजाराचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. यातही पुणे शहरात या रुग्णांची संख्या सर्वात जास्त असल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यभर टाळेबंदी सुरू केली आहे. 

राज्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारपासून ३१ मार्चपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे. खबरदारीचे सर्व उपाय घेतले जात असले, तरीही या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. औरंगाबादेत सापडलेल्या कोरोनाग्रस्त महिलेच्या आजाराच्या निदानानंतर ही संख्या आता ३२ वर गेल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत बोलताना म्हटलं आहे. 

औरंगाबादेतील या महिलेबद्दल अजून पुरेशी माहिती समोर आलेली नाही. पण तिचं वय ५९ वर्षे असून, ही महिला रशिया, कझाकिस्तानचा प्रवास करत औरंगाबादला आली होती, असं समजलं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB Win IPL 2026 Final: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 'जेतेपद' राखले! असा पराक्रम करणारा तिसरा संघ, विराट कोहलीची Fastest Fifty

विधान परिषदेसाठी भाजपची ११ उमेदवारांची यादी जाहीर; प्राजक्त तनपुरेंनाही संधी, राजकीय चर्चांना उधाण

Dhananjay Deshmukh: बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप 'फुसका बार'; सीसीटीव्हीने उघड केला दोन्ही बाजूंचा बनाव

Suman Kalyanpur: भारतीय संगीतविश्वातील सुवर्णपान हरपले! ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीतविश्व शोकमग्न

IPL 2026 Final, RCB vs GT live: गतविजेत्या बंगळुरूने इतिहास रचला! मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, बनला पहिला संघ...

SCROLL FOR NEXT