संग्रहीत छायाचित्र 
छत्रपती संभाजीनगर

पावसाळ्यातील पाण्याची अशी करा साठवण 

संदीप लांडगे

औरंगाबाद ः पाणी निर्माण करता येत नाही अन् पाण्याला अन्य कुठला पर्यायही नाही. म्हणूनच जीवन असे संबोधणाऱ्या पाण्याचे सर्वांगीण व्यवस्थापन हाच एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे. यंदाच्या पावसाळ्यात पावसाचे पाणी जिरविण्यासाठी व्यवस्थापन करण्याची हीच योग्य संधी आहे. या संधीचा सदुपयोग करीत प्रत्येकाने त्यांच्या अंगणात शोषखड्डा तयार करून भविष्यातील पाणीटंचाईचे संकट टाळावे, असा सल्ला जलतज्ज्ञांनी दिला आहे.
 
दरवर्षी पाण्याचा वापर वाढत असून, त्या तुलनेत पाण्याची बचत किंवा साठवणूक जमिनीत होत नाही. मागील शतकात लोकसंख्या तिपटीने वाढल्याने पाण्याचा उपसा व वापर सहापटीने वाढला. गोड पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले. वाढती जलटंचाई व जलप्रदूषण या समस्येवर उपाययोजना आवश्यक आहेत. पावसाळ्यात पडणारा पाऊस वाहून जाऊ द्यायचा, त्यानंतर तेच पाणी मिळवण्यासाठी टॅंकरची मागणी करायची असे उफराटे नियोजन आपल्याकडे सुरू आहे. महाराष्ट्रातील ८५ टक्के पाणीपुरवठा योजना या भूजलावर अवलंबून आहेत. ग्रामीण महिलांचा बहुतांश वेळ पाणी मिळविण्यात खर्च होतो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भूजलातील पाणी उपसण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र तीव्र पाणीटंचाई वाढली आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

या समस्येवर जलफेरभरण हा योग्य उपाय आहे. प्रत्येकाने स्वतःच्या कुटुंबाचा विचार करून सुरक्षित, आवश्यक तेवढाच पाण्याचा वापर केला आणि भविष्यातील पुंजी म्हणून पाणी व्यवस्थापन केले तर आपोआपच राज्यात मोठ्या प्रमाणात जलसंवर्धन होईल, असा विश्वास ग्रामविकासचे जलतज्ज्ञ व अभ्यासक नरहरी शिवपुरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

असा करा जलफेरभरण शोषखड्डा 
घरावर पडणारे पावसाचे पाणी तसेच अंगणातून वाहून जाणारे पाणी अंगणातच उताराच्या ठिकाणी शोषखड्डा करून जिरवता येते. शोषखड्डा कूपनलिका किंवा विहिरीपासून पाच ते सहा फूट अंतरावर असल्यास फायद्याचे ठरते. शोषखड्डा साधारणपणे लांबी, रुंदी ३ बाय तीन व २.५ ते तीन फूट खोल असावा. जागा कमी असल्यास २.५ बाय २.५ लांबी, रुंदी व दोन फूट खोल असावा. खड्डा खोदल्यानंतर त्यामध्ये सर्वप्रथम एक फुटापर्यंत मोठे दगड टाकावेत. त्यानंतर एक फूट बारीक चिपा टाकाव्यात, त्यावर एक फूट गोल दगड किंवा गिट्टीचा थर करावा. त्यानंतर एक फूट विटांचा थर करून त्यावर सहा इंच मध्यम आकाराची गिट्टी, सहा इंच रोडी व सहा इंच बारीक रेती टाकून या शोषखड्ड्यात वाहून जाणारे पाणी जिरवावे. 

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी वेळोवेळी हात धुणे तसेच अंघोळीसाठी पाण्याचा वापर वाढला आहे. म्हणून यंदाच्या पावसाळ्यात पाणीटंचाई दूर करण्यासाठी छतावरील किंवा अंगणातील पाणी साठवण्यासाठी शोषखड्डा तयार करून भविष्यातील पाणीसंकट दूर करावे. 
- नरहरी शिवपुरे, ग्रामविकास संस्था 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाळा ५ किमी अंतरावर असेल तर विद्यार्थ्याला ६००० रुपये मिळणार, सरकारची मोठी घोषणा, योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

Mhada Lottery: म्हाडाला लागणार घरांची लाॅटरी, सर्वसामान्य मुंबईकरांचं होणार स्वप्नपूर्ण; पहा कधी निघणार सोडत?

Pune News : वेश्याव्यवसायास नकार दिल्याने बांगलादेशी अल्पवयीन मुलीला कोंडून मारहाण

Bangladesh Hindu AttacK: हिंदू व्यापाऱ्याला बेदम मारहाण, जीव गेल्यावर मृतदेहावर नाचले हल्लेखोर; बांग्लादेशातील अराजकता थांबेना

Pune Crime : हडपसर, वाकडेवाडी परिसरात अमली पदार्थ जप्त, पाच जणांना अटक

SCROLL FOR NEXT