File Photo 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत सायंकाळपर्यंत आढळले 86 कोरोनाबाधित, रुग्णसंख्या @836

मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज (ता. 15) आतापर्यंत एकूण 86 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे दुपारी एकपर्यंत असलेला आकडा आणखी 6 ने वाढून रुग्णसंख्या  86 झाली.  
 शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 836  झाली आहे.  

घाटीच्या लॅबमध्ये गुरुवारी (ता. 14) रोजी घेण्यात आलेल्या एकूण सॅम्पलपैकी 243 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले ही सकारात्मक बाब आहे. 

एकूण रुग्णसंख्या - 836 (सांयकाळी सव्वाचारपर्यंत )
औरंगाबाद शहरातील आढळलेल्या (6) रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)

जुना मोंढा, भवानी नगर (1), रेहमानिया कॉलनी (2), बायजीपुरा (2),  हुसेन कॉलनी (1) या भागातील रुग्णांचा समावेश आहे.

दुपारी एक - या भागातील (6) रुग्ण बाधित 
औरंगाबाद शहरातील आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. सिल्क मिल कॉलनी (1), चाऊस कॉलनी (2) आणि हुसेन कॉलनी (3) या भागातील रुगांचा समावेश आहे.

औरंगाबाद शहरातील आज सकाळी आढळलेल्या (74)  रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) एन सहा,सिडको (2), बुढीलेन (1), रोशन गेट (1), संजय नगर (1), सादात नगर (1), भीमनगर, भावसिंगपुरा (2), वसुंधरा कॉलनी (1), वृंदावन कॉलनी (3), न्याय नगर (7), कैलास नगर (1), पुंडलिक नगर (8),सिल्क मील कॉलनी (6), हिमायत नगर (5), चाऊस कॉलनी (1), भवानी नगर (4), हुसेन कॉलनी (15), प्रकाश नगर (1)  शिव कॉलनी गल्ली नं. 5, पुंडलिक नगर (1), हुसेन कॉलनी, गल्ली नं. 5 (2), रहेमानिया कॉलनी (2), बायजीपुरा (5), हनुमान नगर (1), हुसेन नगर (1), अमर सोसायटी (1), न्यू हनुमान नगर, गल्ली नं.1, दुर्गा माता मंदिर (1) या भागातील कोरोनाबाधित आहे.

एकूण 230 जण कोरोनमुक्त 
जिल्हा रुग्णालयात उपचारानंतर मुकुंदवाडी येथील 5, नूर कॉलनी येथील 3, अशा आठ जणांना व घाटीतुन संजयनगर येथील एक महिला, तीन मूले, टाऊन हॉल येथील 71 वर्षीय जेष्ठ नागरिक अशा पाच जणांना आणि मनपाच्या कोव्हीड केअर सेंटरमधून सात जणांना सुटी देण्यात आली.

त्यामुळे गुरूवारी दिवसभरात 20 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा आता 230 वर गेला आहे.

कोरोना मिटर 
उपचार घेणारे रुग्ण -585
बरे झालेले रुग्ण -230
एकूण मृत्यू       -21

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert Today : पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे! महाराष्ट्रातील 'या' 11 जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा, हवामान विभागाचा Yellow Alert जारी

Anjangaon: खेलोबा देवस्थानाची जागा असल्याचे मान्य! शिवरायांच्या पुतळ्याबाबत अखेर तोडगा; राजन पाटलांची मध्यस्थी, एका रात्रीत काय घडलं?

Sangli Sambhaji Maharaj Statue : सांगलीत रात्रीतून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून तात्काळ कारवाई

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

Spicy Thecha Paneer Wrap: वीकेंड नाश्त्यासाठी बनवा झणझणीत थेचा-पनीर रॅप; फक्त २० मिनिटांत तयार होणारा हेल्दी ऑप्शन!

SCROLL FOR NEXT