संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र 
छत्रपती संभाजीनगर

कोरोनामुळे नववीच्या फेरपरीक्षेला असा लागला ब्रेक... 

संदीप लांडगे

औरंगाबाद ः लॉकडाउनच्या सुरवातीला नववीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा सुरू झाल्यावर फेरपरीक्षा घेऊन त्यात पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीत प्रवेश देण्यात यावा, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या होत्या. नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने शाळा कधी सुरू होतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे नववीच्या फेरपरीक्षेवर प्रश्नचिन्ह आहे. 

इयत्ता नववीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून फेरपरीक्षा घेतली जाते; मात्र यंदा कोरोनामुळे कोणत्याही शाळांकडून नववीची फेरपरीक्षा घेण्यात आली नाही. आठवीपेक्षा नववीत अभ्यासाची काठिण्यपातळी वाढते. त्यामुळे सुरवातीला घेतलेली चाचणी परीक्षा आणि सत्र परीक्षा याआधारे निकाल लावल्याने अनेक शाळांनी नववीत विद्यार्थ्यांना नापास केले. या विद्यार्थ्यांची सध्या फेरपरीक्षा शक्य नाही. शाळा सुरू होण्याची वाट पाहत राहिले तर खूप उशीर होईल, म्हणून नववीमध्ये नापास झालेले विद्यार्थी शाळेच्या दहावीच्या ऑनलाइन वर्गांना हजेरी लावत आहेत. 

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून काही शाळांनी विद्यार्थ्यांना दहावीची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढे नववीची फेरपरीक्षा झालीच तर त्यात पास होऊन किंवा बोर्डाचा १७ नंबरचा अर्ज भरून हे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसू शकतात, असे संस्थाचालक वाल्मीक सुरासे यांनी सांगितले. नववीत नापास विद्यार्थ्यांसमोर सध्या १७ नंबरचा अर्ज भरून दहावीच्या परीक्षेला बसण्याचा पर्याय आहे; पण त्यासाठी विद्यार्थ्यांना 'शाळा सोडल्याचा दाखला' घ्यावा लागणार आहे. त्यावर 'नववी नापास' असा शेरा मिळणार असल्याने विद्यार्थी, पालक नववीच्या फेरपरीक्षेचा निर्णय कधी होणार, याची वाट पाहत आहेत. 

हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात.. 

जर एखादा विद्यार्थी क्षमतेनुसार नववीची परीक्षा उत्तीर्ण झाला नसेल, अशा विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावर शाळांनी शिकवून त्या विषयाची परीक्षा घ्यावी. त्यात तो विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास पुढील वर्गात पाठवावे. सध्या कोरोनामुळे शाळांना या परीक्षा घेणे शक्य नाही; पंरतु शाळा सुरू झाल्यानंतर परीक्षा घेतल्या जातील. 
-डॉ. बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT