couple with a 5 -year-old daughter committed suicide 3 family members died by Suicide in Sambhajinagar  
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar : पाच वर्षांच्या चिमुरडीसह पती-पत्नीने घेतला गळफास! ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने हळहळ

रोहित कणसे

वाळूज महानगर - एकाच कुटुंबातील पती-पत्नी व पाच वर्षीय मुलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. वाळूज परिसरातील हृदय पिळवटून टाकणारी ही घटना वळदगाव येथे शुक्रवारी तारीख 19 रोजी सकाळी उघडकीस आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, संभाजीनगर येथील वाळूज परिसरातील वळदगाव येथे मोहन प्रतापसिंग डांगर (वय 30), पूजा मोहन डांगर (वय 25) व श्रेया (वय पाच) वर्ष असे गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आलेल्यांची नावे आहेत.

मोहन डांगर हे वळदगाव येथे भाड्याच्या घरात राहून शेती करत होते. अशी माहिती गावकऱ्यांनी दिली. घटनेपूर्वी गुरुवारी कुटुंब जेवण करून रात्री झोपले, त्यानंतर रात्री हा अत्यंत हृदय पिळवटून टाकणारा प्रकार घडला.

सासर-माहेर एकाच गावात असलेल्या पूजाची मुलगी श्रेया ही दररोज सकाळी शेजारीच राहणाऱ्या आजीकडे जात असते. शुक्रवारी सकाळी मात्र ती न आल्याने आजी तिला पाहण्यासाठी डांगर यांच्या घराकडे गेली असता घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तिघांचेही मृतदेह घाटीत रवाना केले. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेचे कारण मात्र समजू शकले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर सरन्यायाधीशांना वेळ मिळाला! विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्ट तयार, पण सुनावणी कधी?

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

SCROLL FOR NEXT