Court sakal
छत्रपती संभाजीनगर

नामांतराविरोधात न्यायालयीन लढाई

नामांतर विरोधी कृती समितीचा निर्धार

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामांतर करण्याचा निर्णय राज्य सरकारने शनिवारी जाहीर केल्यानंतर नामांतर विरोधी कृती समितीतर्फे तीव्र विरोध केला. आहे. या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलना बरोबर पुन्हा न्यायालयीन लढा देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि कृती समितीचे अध्यक्ष मुश्ताक अहमद यांनी दिली आहे.

औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याचा निर्धार वर्ष १९९५ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला होता. त्यावेळी मुश्ताक अहमद यांच्या अध्यक्षतेखाली संभाजीनगर विरोधी कृती समितीची स्थापना झाली होती. या समितीने नामांतराविरोधात पाच लाख नागरिकांच्या हरकती शासनाकडे पाठवल्या होत्या; तसेच या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र, सरकारने अधिसूचना काढण्यापूर्वीच याचिका दाखल केल्याने खंडपीठाने याचिका फेटाळली होती. १९९९ मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले, त्यावेळी संभाजीनगरचा निर्णय रद्द केला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाची याचिका मागे घेतली होती. आता पुन्हा न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार केल्याचे अहमद यांनी सांगितले.

भाजपतर्फे जल्लोष

औरंगाबादचे नामकरण ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतल्यानंतर भाजप शहर कार्यकारिणीतर्फे आज शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा गड असलेल्या गुलमंडीवर फटाके फोडत आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला.अडीच वर्षे या सरकारने जनतेला खेळवत ठेवल्याचा आरोप संजय केणेकर यांनी केला. शहरवासीयांना नवे ‘गिफ्ट’ देत हिंदुत्वाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना चांगलीच चपराक दिल्याचेही ते म्हणाले.

औरंगाबादला नामांतराची नव्हे तर विकासाची गरज आहे. आता तरुणांना नोकऱ्या मिळणार का? आमचे क्रीडा विद्यापीठही आणणार का? इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर केव्हा मिळेल?

- इम्तियाज जलील, खासदार, एमआयएम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT