छत्रपती संभाजीनगर

न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संपाचा इशारा

CD
न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप - हिंगोली, ता. १६ : मुंबई उच्च न्यायालयाच्या धर्तीवर राज्यातील दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी व वेतनवाढ लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी मंगळवारपासून (ता. १७) न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. या संपात हिंगोली जिल्ह्यातील सुमारे अडीचशेंवर कर्मचारी सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघ गट (क), महाराष्ट्र ज्युडिशियल स्टेनोग्राफर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य न्यायालय बेलिफ कर्मचारी महासंघ, राज्य न्यायालयीन गट (ड) कर्मचारी महासंघ या संपात सहभागी होणार आहेत. हा संप राज्यव्यापी राहणार असून, या संपाच्या माध्यमातून ३१ जानेवारी २०२५ रोजी लागू करण्यात आलेली उच्च न्यायालयाच्या धर्तीवर सुधारित वेतनश्रेणी व वेतनवाढ जिल्हा, तालुका न्यायालयांतील कर्मचाऱ्यांना लागू करावी, ही प्रमुख मागणी करण्यात येणार आहे. दरम्यान, यापूर्वीही न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले होते. परंतु, मागणीसंदर्भात निर्णय झाला नसल्याने आता बेमुदत संप पुकारण्यात येत असल्याचे जिल्हा न्यायालयीन बेलिफ संघटनेचे अध्यक्ष एल.ए. थोरे यांनी सांगितले. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा ठाम निर्धार न्यायालयीन कर्मचारी संघटनेच्या वतीने घेण्यात आल्याचेही थोरे म्हणाले. कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एस.व्ही. देशमुख, महाराष्ट्र स्टेट ज्युडिसिअल स्टेनोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष ए.पी. देशमुख, बेलिफ संघटनेचे अध्यक्ष एल.ए. थोरे, न्यायालयीन गट (ड) कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बी.डी. बेंडके यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti news : सोलापुरात ऊस दरावरून रणकंदन; राजू शेट्टी आक्रमक

Luck Zodiac Signs: पुढचे १२२ दिवस या राशींवर पडणार पैशांचा पाऊस! गुरूच्या वक्री चालीचा मोठा फायदा; नशिबाची दारं उघडणार? तुमची रास कोणती?

Syed Mushtaq Ali Trophy: सूर्यकुमारचं वादळ पुन्हा घोंगावलं! ९ चौकार अन् ७ षटकारांसह अर्धशतक करत मुंबईला मिळून दिला मोठा विजय

Latest Marathi News Update : सोलापूरनंतर आता 'स्वाभिमानी'चा मोर्चा बारामतीकडे; ऊसाच्या पहिल्या उचलीसाठी कारखान्यांना २५ तारखेपर्यंतचा अल्टीमेटम

Supreme Court: सुनावणीपूर्वी इंडिया आघाडीची आक्रमक खेळी; मुख्य निवडणूक आयुक्तांना 48 प्रश्न विचारण्याची मागितली परवानगी

SCROLL FOR NEXT