छत्रपती संभाजीनगर

दिवाळीच्या काळात हातगाड्यांवर कारवाई नको

CD
दिवाळीच्या काळात हातगाड्यांवर कारवाई नको उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे निर्देश; ११ जानेवारीला पुढील सुनावणी छत्रपती संभाजीनगर, ता. ६ : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील हातगाडीधारक आणि पथविक्रेत्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एन.बी. सूर्यवंशी आणि न्या. आबासाहेब डी. शिंदे यांनी अंतरिम दिलासा दिला. पुढील आदेशापर्यंत पथविक्रेत्यांवर कोणतीही प्रतिबंधात्मक अथवा दंडात्मक कारवाई करू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याचिकेवर पुढील सुनावणी ११ जानेवारीला होणार आहे. लोकसेवा हातगाडी चालक-मालक सहकारी संस्थेच्या अध्यक्षा चित्रा डी. जगताप यांनी ॲड. अविनाश आर. बोरुळकर यांच्या मार्फत याचिका दाखल केली. पैठणगेट आणि सब्जी मंडी परिसरातील हातगाडीधारक व मोबाइल पथविक्रेत्यांना व्हेंडिंग परवाने द्यावेत, त्यांचे सर्वेक्षण करून नोंदणी, ओळखपत्र व प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी संस्थेने केली आहे. या संदर्भात ५ ऑक्टोबर २०२६ला संबंधित प्रशासनाकडे अर्जही केला होता. मात्र, परवाना मिळण्याची प्रक्रिया प्रलंबित असल्याने विक्रेत्यांवर कारवाईची भीती कायम होती. याप्रकरणी न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. राज्य शासनाच्या वतीने सहायक सरकारी वकील नेहा बी. कांबळे यांनी, तर प्रतिवादी क्रमांक दोन यांच्या वतीने ॲड. पार्थ साळुंखे यांनी नोटीस स्वीकारली. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. अविनाश बोरुळकर यांनी बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ACB Action: मोफत कायदेशीर मदतीच्या नावाखाली लाचखोरी! वकील ताब्यात, पत्नीविरोधातही गुन्हा; एसीबीने रंगेहाथ पकडलं

Maharashtra Village Diwali Bonus: महाराष्ट्रातील 'या' गावाची कमाल! गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस; विकासाच्या जोरावर देशभर डंका

Lavrov Deepfake: बनावट व्हिडिओमुळे प्रशांत भूषण अडचणीत; दिल्ली पोलिसांनी दाखल केली FIR

ना हिरो, ना खलनायक; महेश कोठारेंच्या 'माझा छकुला' मध्ये हमाल म्हणून दिसलेले सचिन गोस्वामी; कशी मिळालेली भूमिका? म्हणाले-

Pune Crime: पुण्यात व्यावसायिकावर गोळीबार करून २२ तोळ्यांचे सोने लुटले; उत्तर प्रदेशातील टोळीला मकोका

SCROLL FOR NEXT