covid 19
covid 19 covid 19
छत्रपती संभाजीनगर

दिलासादायक! औरंगाबादमध्ये मे महिन्यात कोरोना संसर्गाची घसरण

माधव इतबारे

औरंगाबाद: कोरोना संसर्गाची (covid 19 in aurangabad) लाट हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांचा विचार करता मे महिन्यात कमी रुग्ण आढळून आले आहेत. मे महिन्यात जिल्ह्यात १८,५२५ रुग्ण आढळले असून, मार्च महिन्यात ३२,३१३ तर एप्रिल महिन्यात तब्बल तब्बल ४१,५२८ रुग्ण आढळले होते.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट मे महिन्यापासून ओसरण्यास सुरवात झाली. पण ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या जास्त होती. मार्च व एप्रिल महिन्याचा विचार करता मे महिन्यात रुग्णांचा आलेख झपाट्याने खाली आला आहे. मार्च महिन्यात जिल्ह्यात एकूण ३२,३१३ कोरोनाबाधित आढळले, तर ४०२ बाधितांचा मृत्यू झाला होता. एप्रिलमध्ये ४१,५२८ रुग्ण आढळले. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये ९,२१५ कोरोनाबाधित अधिक आढळले. मे महिन्यात मात्र १८,५२५ एवढे रुग्ण आढळले. यात शहरातील ६,६६६ रुग्णांचा समावेश असून ग्रामीणमधील बाधितांची संख्या ही ११,८५९ एवढी आहे.

तसेच एप्रिल महिन्याच्या अखेरीस शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा ११.४४ टक्के एवढा होता. तो ३१ मेला २.८३ एवढा नोंदला गेला. आता तो २.२६ वर आला आहे. शहरात आत्तापर्यंत आढळलेल्या एकूण ८६,२४२ रुग्णांच्या प्रमाणानुसार सरासरी पॉझिटिव्हिटी रेट हा ११.४६ टक्के एवढा असल्याचे महापालिकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. रुग्णसंख्या कमी झाली असली तरी गेल्या दोन दिवसांपासून बाजारातील गर्दी वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

तीन महिन्यांत आढळलेले रुग्ण

महिना------- शहर------ ग्रामीण

मार्च---------- २४,१८८---- ८,१२५

एप्रिल-------- २१,२९५------ २०,२३३

मे- -----------०६,६६६------ १८,५२५

मृत्युदर------ २.१५ %--------- २.३ %

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT