corona corona
छत्रपती संभाजीनगर

Covid 19 Curfew: माजी आमदारांच्या मुलाच्या लग्नात ५० हून अधिक वऱ्हाडी

प्रतिष्ठेच्या लग्न सोहळ्यावर कारवाई, लॉन्स मालकासह वधू पित्यावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभासारख्या गर्दीच्या कार्यक्रमांसाठी उपस्थितांची मर्यादा ठरवून दिलेली आहे. लग्नासाठी २५ वऱ्हाडी मंडळींची २५ जणांची परवानगी देण्यात आलेली आहे. असे असले तरी गारखेडा परिसरातील प्रतिष्ठित नागरिक आणि माजी आमदारांच्या मुला-मुलीच्या विवाहात कोरोनाच्या अनुषंगाने घालून दिलेल्या सर्वच नियमांचा भंग करण्यात आला आहे.

या प्रकरणीत चिकलठाणा पोलिसांनी चितेपिंपळगाव येथील बागडे पाटील लॉन्सच्या मालकासह वधु पित्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. इतकेच नव्हे तर लॉन्स मालकाला ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

या प्रकरणी चित्तेपिंपळगाव परिसरातील बागडे पाटील लॉन्समध्ये मंगळवारी (ता.५) दुपारी गारखेडा भागातील प्रतिष्ठित नागरिक गणेश भारत चौधरी यांच्या मुलीशी पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या मुलाचा लग्न सोहळा सुरू होता. या लग्न समारंभात २५ पेक्षा जास्त वऱ्हाडींची उपस्थिती होती. याबाबतची माहिती मिळाल्यावरुन चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी कर्मचाऱ्यांसह धाव घेतली.

त्यानंतर पोलिसांनी लॉन्स मालक प्रल्हाद कडूबा बागडे आणि आयोजक वधू पिता गणेश चौधरी यांना ताब्यात घेतले. चितेगाव ग्रामपंचायत कोविड-१९ चे समिती सदस्य पांडूरंग सर्जेराव सोनवणे यांच्या तक्रारीवरुन चिकलठाणा पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर लॉन्स मालक प्रल्हाद बागडे यांना ५० हजारांचा दंड आणि नोटीस बजावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

PSL 2026: अपमानाचे घोट गिळत, बाबर आझम पेटला, १२ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; मेंडिसचे शतक अन् समदच्या ३३३ च्या स्ट्राईक रेटने धावा...

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

Pune Mulshi Bhalgudi fire News: भालगुडीतील लव्हाळवाडीत आठ घरांना भीषण आग; आठ कुटुंबे उघड्यावर, पावसाळ्यापूर्वी घरकुल व तातडीच्या मदतीची मागणी

Pune Voter Mapping: वडगाव शेरीत सव्वा लाख मतदारांचे मॅपिंग पूर्ण; उर्वरित मतदारांना SIR मोहिमेत लवकर सहभागी होण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT