corona vaccination corona vaccination.
छत्रपती संभाजीनगर

Corona Vaccination: दोन लसींमधील अंतर होणार कमी!

शहरातदेखील दोन लसींमधील अंतर कमी करण्यासाठी नाशिक महापालिकेकडून माहिती मागविण्यात आल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले

माधव इतबारे

शहरातदेखील दोन लसींमधील अंतर कमी करण्यासाठी नाशिक महापालिकेकडून माहिती मागविण्यात आल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले

औरंगाबाद: महापालिकेकडे एक लाखापेक्षा अधिक लसी शिल्लक आहेत. मात्र, लस घेण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद कमी झाला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा कोरोना संसर्गाच्या सुपर स्प्रेडरकडे लक्ष केंद्रित केले आहे. नाशिक महापालिकेने सुपर स्प्रेडससाठी दोन लसींमधील अंतर कमी केले आहे. त्याधर्तीवर शहरातदेखील दोन लसींमधील अंतर कमी करण्यासाठी नाशिक महापालिकेकडून माहिती मागविण्यात आल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

कोरोना प्रतिबंधक लसींचा काही काळ तुटवडा होता. नेमक्या त्याचवेळी दुसरी लाट भरात होती. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी केली. लसीकरणासाठी आवश्‍यक टोकन घेण्यासाठी नागरिक पहाटेपासून ठाण मांडून बसल्याचे चित्र होते. पण गेल्या महिनाभरापासून कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे नागरिकांमधील भीती कमी झाली असून, लसी घेण्यासाठी चालढकल सुरू झाली आहे. दरम्यान महापालिकेला गेल्या काही दिवसांपासून लसींचा मुबलक साठा मिळत आहे. शिवाय बजाज समुहाने एक लाख १२ हजार ५०० लसी महापालिकेला दिल्या आहेत. त्यामुळे शिल्लक लसींची संख्या एक लाखापेक्षा जास्त आहे. असे असताना प्रत्येक लसीकरण केंद्रावर दिवसभरात केवळ ३० ते ४० एवढ्या प्रमाणात लसीकरण होत आहे. लसीकरणाची संख्या वाढविण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

शहरातील गर्दीच्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी, कामगार तसेच जास्तीत जास्त नागरिकांच्या संपर्कात येणारे नागरिक अशा सुपर स्प्रेडरच्या लसीकरणावर जोर दिला जाणार आहे. यासंदर्भात डॉ. पाडळकर यांनी सांगितले की, नाशिक महापालिकेने सुपर स्प्रेडरच्या दोन लसीमधील कालावधी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेकडून माहिती मागविण्यात आली आहे. त्याच धर्तीवर शहरातील सुपर स्प्रेडला लसीकरण करण्याबाबत विचार सुरू आहे.

आत्तापर्यंतचे लसीकरण-

  • एकूण उद्दिष्ट- ११ लाख ७६ हजार ९९९

  • पहिला डोस घेतलेले नागरिक- ४ लाख ८७ हजार ९३८

  • दोन्ही डोस घेतलेले नागरिक-२ लाख ५ हजार ७७०

  • एकूण- ६ लाख ९३ हजार ७०८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT