छत्रपती संभाजीनगर

तुळजापुरात पाच हजार ४०९ जण कोरोनातून झाले बरे

जगदीश कुलकर्णी

तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाशिवाय तुळजाभवानी मंदिराची घाटशीळ रस्त्यावरील धर्मशाळा कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात आली. सध्या नगरपालिकेच्या एका धर्मशाळेमध्येही कोरोनाचे रुग्ण ठेवण्यात आले आहेत.

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : येथील उपजिल्हा रुग्णालयाअंतर्गत (Tuljapur Sub-District Hospital) आजवर पाच हजार ४०९ कोरोनारुग्ण (Corona) उपचाराअंती बरे झाले असून, त्यांना रूग्णालय प्रशासनाकडून सुटी देण्यात आली आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. कोरोना सुरू झाल्यापासून तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाअंतर्गत सहा हजार ३८७ रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामध्ये १८७ रुग्ण मृत झाले आहेत. तुळजापूर तालुक्यातील (Osmanabad) कोरोना रूग्णांशिवाय लोहारा तालुक्यातील अनेक गावांतील रूग्ण तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे तुळजापूर (Tuljapur) शहरातील रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येत आहे.

तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाशिवाय तुळजाभवानी मंदिराची घाटशीळ रस्त्यावरील धर्मशाळा कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात आली. सध्या नगरपालिकेच्या एका धर्मशाळेमध्येही कोरोनाचे रुग्ण ठेवण्यात आले आहेत. तसेच शहरातील खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रूग्ण दाखल करण्याचे प्रमाण मोठे आहे. असे असले तरी उपजिल्हा रुग्णालयातून झालेल्या उपचाराचा परिणाम चांगल्या प्रकारे झालेला आहे. शहरात सध्या ३१३ कोरोना रूग्ण उपचार घेत आहेत. त्यामध्ये नळदुर्ग येथील ६१, मगर हॉस्‍पिटल ८, कुतवळ हॉस्‍पिटल २९, नगरपालिकेच्या धर्मशाळेत १५६, तर उपजिल्हा रुग्णालयात ५९ रूग्ण आहेत. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.चंचला बोडके यांनीही कोरोनाच्या प्रारंभी चांगली धुरा सांभाळली.

ऑक्सिजन जम्बो सिलेंडर : तुळजापूरच्या घाटशीळ रस्त्यावरील धर्मशाळा सध्या पूर्णतः रिकामी आहे. याचा फायदा भविष्यात आरोग्य प्रशासनास होईल. तसेच तुळजाभवानी मंदिर समितीने सुमारे एक कोटी रुपये खर्च करून ऑक्सिजनचे जम्बो सिलेंडर कार्यान्वित केले आहे.

कोरोनाची रूग्ण संख्या सध्या कमी होत आहे. ५ हजार ४०९ रूग्ण कोरोनातून बरे झालेले आहेत. सध्या आमच्याकडे २१ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत.

डॉ.श्रीधर जाधव, नोडल ऑफिसर, उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT