छत्रपती संभाजीनगर

गोहत्याबंदी कायदा व गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्याची मागणी

CD
(अँकर) ABD26J83264 तीर्थपुरी ः महंत संगमजी महाराज यांच्या हस्ते जनजागृती पत्रकाचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थ. ..................... गोहत्याबंदीच्या मागणीसाठी तीर्थपुरीत जनजागृती ----- गोमातेच्या संरक्षणासाठी देशव्यापी अभियान; जिल्ह्यात २० लाख स्वाक्षऱ्यांचे उद्दिष्ट ---- तीर्थपुरी, ता. १६ (बातमीदार) : गोहत्येला पूर्णपणे प्रतिबंध घालण्यासाठी देशभरात गोहत्याबंदी कायदा लागू करावा, तसेच गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा, या मागण्यांसाठी सुरू असलेल्या ‘गो सन्मान व आव्हान अभियाना’अंतर्गत तीर्थपुरी येथील दुर्गादेवी मंदिरात रविवारी (ता. १५) जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरात गोमातेचे संरक्षण, गोहत्याबंदी आणि गोसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी जालना येथील महंत श्री संगमदाजी महाराज यांच्यासह तीर्थपुरीतील साधू-संत, महाराज, राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभरात गोहत्याबंदीचा कठोर कायदा लागू करावा आणि गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जालना जिल्ह्यात २० लाख, महाराष्ट्रात १० कोटी, तर संपूर्ण देशभरातून ३३ कोटी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या संकलित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. येत्या १ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर या अभियानाचा भव्य प्रारंभ होणार आहे. संकलित स्वाक्षऱ्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे गोहत्याबंदी कायदा लागू करण्यासह गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्याची मागणी करण्यात येणार आहे. या मागणीसाठी देशभरातील साधू-संत, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटना आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी पुढाकार घेतला आहे. या कार्यक्रमाला तीर्थपुरीतील साधू-संत, महाराज, प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती. ............. सर्व घटकांकडून सहकार्याची अपेक्षा गोमातेचे संरक्षण ही केवळ एखाद्या व्यक्तीची किंवा संघटनेची जबाबदारी नसून, त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन सहकार्य करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने या अभियानाची आणि जनभावनेची दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, असे आवाहन मान्यवरांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy: सूर्यकुमारचं वादळ पुन्हा घोंगावलं! ९ चौकार अन् ७ षटकारांसह अर्धशतक करत मुंबईला मिळून दिला मोठा विजय

Supreme Court: सुनावणीपूर्वी इंडिया आघाडीची आक्रमक खेळी; मुख्य निवडणूक आयुक्तांना 48 प्रश्न विचारण्याची मागितली परवानगी

Spine Surgery: जन्माची वाट न पाहता आईच्या गर्भातच बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया; AIIMSच्या डॉक्टरांनी रचला इतिहास

Gold-Silver Crash: सोनं-चांदीचे भाव कोसळले! लग्नसराईआधी वर्षातील सर्वात स्वस्त दर; नेमकं कारण काय? आणखी स्वस्त होणार?

Latest Marathi News Update : मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानातील सुरक्षारक्षकांना मारहाण प्रकरण; न्यायालयाकडून तिन्ही आरोपींना जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT