छत्रपती संभाजीनगर

येथून इनोव्हा कार गाडीने

CD
इनोव्हा कारमधून दोन गायींची चोरी; घटना सीसीटीव्हीत कैद ----- मांडवी, ता. २ (बातमीदार) : किनवट तालुक्यातील उनकेश्वर येथे इनोव्हा कारमधून आलेल्या चौघांनी दोन गायींना भूलीचे इंजेक्शन देऊन त्यांची चोरी केल्याची घटना ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी मांडवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमरी बाजार येथून मंगळवारी (ता. २७) रात्री जनावरे चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच त्यांच्या परिसरातील उनकेश्वर येथेही चोरीचा प्रकार घडला. जिल्हा परिषद शाळेसमोरील मोकळ्या जागेत रात्री पाच ते सहा जनावरे बसली होती. त्यावेळी उनकेश्वर मंदिराकडून उमरी (बा.)कडे जाणाऱ्या रस्त्याने काळ्या रंगाची इनोव्हा कार आली. त्यातून काळे कपडे घातलेला एक व्यक्ती खाली उतरला. त्याने क्षणाचाही विलंब न करता एका काळ्या गायीला इंजेक्शन टोचले. त्यानंतर दुसऱ्या पांढऱ्या गायीला इंजेक्शन दिले. या प्रकारामुळे इतर गायी पळून गेल्या. त्यानंतर अशोक कन्नलवार यांची गाय कारमध्ये टाकण्यात आली. संतोष पडवाळ यांची गाय बेशुद्ध न झाल्याने तिला दोरीने बांधून गावाबाहेर नेण्यात आले आणि कारमध्ये टाकण्यात आले. शेतकऱ्यांनी गायींचा शोध घेतला. मात्र, त्या मिळून आल्या नाहीत. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. संतोष जगन्नाथ पडवाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन गायींच्या चोरीप्रकरणी मांडवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक गंगाधर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अस्वले पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: यंदाच्या दिवळीत फक्त ग्रीन फटाके फोडण्यासच सर्वोच्च न्यायालयाची परवानगी; वेळेची मर्यादाही केली निश्चित

Patan Leopard Attack: घरात टीव्ही पाहत बसलेल्या व्यक्तीवर बिबट्याचा हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत, पाटण तालुक्यात खळबळ, महिला भांडी घासत हाेती अन्..

Maharashtra District Courts Bomb Threat : न्यायव्यवस्था हादरली! पुण्याच्या शिवाजीनगरसह राज्यभरातील न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; एकाच वेळी मेल आल्याने मोठी खळबळ

Palghar Court: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील न्यायालयांना धमक्या! पालघर न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; ई-मेलमुळे खळबळ, संपूर्ण परिसर रिकामा

Maharashtra Drought: महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये ९५ टक्के कमी पाऊस; मराठवाडा कोरडा, दुष्काळाचे संकट आणखी गडद

SCROLL FOR NEXT