वेदांत पैठणे Sakal
छत्रपती संभाजीनगर

टाकाऊ प्लॅस्टिक बाटल्यांमधून ‘वेल्थ’ची निर्मिती

औरंगाबादच्या अभियंत्याने उभारला प्लॅस्टिकच्या फेरवापराचा उद्योग

शेखलाल शेख -सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - प्लॅस्टिकचा कचरा दरवर्षी वाढतोय. यामध्ये सर्वाधिक संख्या पाण्याच्या बाटल्यांची आहे. पाणी संपल्यावर या बाटल्या कोठेही फेकून दिल्या जातात. मात्र, याच बाटल्यांचा फेरवापर केल्यास त्यातून उद्योग, व्यवसाय उभा राहू शकतो, असा विचार औरंगाबादमधील वैदांत पैठणे याने केला अन ‘वेस्ट टू वेल्थ’ संकल्पनेवर आधारित ‘डीडी पॉलीफ्लेक्स’ नावाने स्टार्टअप सुरु केला. प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा छोटे-छोटे तुकडे करून ते वस्त्रोद्योग, प्लॅस्टिक शीटच्या कंपन्यांना विकले जातात. वेदांत सध्या महिन्याला २५ ते ३० टन प्लॅस्टिक बाटल्यांचा चुरा तयार करतो.

वेदांत पैठणे याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण औरंगाबादच्या स. भु. महाविद्यालयात झाले. त्याने बी. ई. मेकॅनिकलचे शिक्षण मुंबईच्या भारती विद्यापीठातून पूर्ण केले. शिक्षणानंतर साडेपाच वर्ष एका पोलाद कंपनीत कनिष्ठ व्यवस्थापकपदी त्याने त्याने नोकरी केली. वेदांतला अनेक ठिकाणी प्लॅस्टिकच्या बाटल्या पडलेल्या दिसायच्या. याच बाटल्यांचा फेरवापर किंवा त्याचा इतर कारणांसाठी वापर केल्यास व्यवसायाची मोठी संधी निर्माण होऊ शकते, यावर त्याने विचार केला. यासाठी त्याने प्लॅस्टिक उद्योग आणि बाजारपेठेचा अभ्यास केला. त्याच्या मनात ‘वेस्ट टू वेल्थ’ ही संकल्पना होतीच. यावर काम करायचे असल्याने त्याने २०१९ मध्ये नोकरी सोडली. यानंतर एक वर्ष कोरोनात गेले. यादरम्यान त्याने स्वतःचा कारखाना उभा करण्याचा निश्‍चय केला.

कारखाना उभारणीचे स्वप्न साकार

वेदांतने प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा चुरी करणारी यंत्रसामग्री नाशिक जिल्ह्यातून आणली. पैठण रस्त्यावरील गेवराई तांडा येथे जागा भाड्याने घेऊन स्वतःचा कारखाना उभा केला. त्याचे वडील महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात आहेत. त्यांचेसुद्धा मार्गदर्शन मिळाले. वेदांतने मिनरल पाण्याच्या बाटल्या बॉटल, शीतपेये व मद्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या जमा करण्यास सुरवात केली. हॉटेल, भंगाराच्या दुकानांशी संपर्क केला. बाटल्यांच्या गटवारीनंतर पांढरा रंगाच्या बाटल्यांचा हिरव्या रंगाच्या बाटल्यांचा चुरा वेगवेगळा तयार केला जातो. तो धुऊन ३० किलोच्या वजनात तो भरली जातो.

चुऱ्याची गुजरात, पुण्यात विक्री

चुऱ्याचे पॅकिंग केल्यानंतर तो गुजरातमधील वस्त्रोद्योग कारखान्यांना विकला जातो. याचा कपडे उद्योगात वापर होतो. औरंगाबाद, पुणे येथील प्लॅस्टिक शीट तयार करणाऱ्या कंपन्यांना चुऱ्याची विक्री केली जाते. वैदांतकडील प्रकल्पाची क्षमता महिन्याला ४० टन बाटल्यांचा चुरा तयार करण्याची आहे. सध्या तो महिन्याला २५ ते ३० टन चुरा तयार करून विक्री करतो. वैदांतच्या स्टार्टअपमधून सहा महिला आणि एक पुरुष अशा सात जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT