bribe sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime : सहायक पोलिस निरीक्षक लाच स्वीकारताना जाळ्यात

पोलिस ठाण्यातच लावलेल्या सापळ्यात ते अडकल्याने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

वाळूजमहानगर : दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शनिवारी (ता.४) पकडले. पोलिस ठाण्यातच लावलेल्या सापळ्यात ते अडकल्याने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी ः वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एका ४२ वर्षीय तक्रारदाराचे पैसे दुसऱ्याकडे अडकले होते. ते पैसे देण्यासाठी त्याने पोलिस ठाण्यात अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मदनसिंग घुणावत यांच्याकडे सोपविण्यात आली होती.

हे पैसे काढून देण्यासाठी घुणावत यांनी २० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्याचाच पहिला हप्ता म्हणून १० हजार रुपये देण्याचे शनिवारी (ता.४) ठरले होते. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. ठरल्याप्रमाणे सापळा रचला आणि त्यात सहायक पोलिस निरीक्षक मदनसिंग घुनावत हे अडकले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक मारुती पंडित, पोलिस निरीक्षक तथा सापळा अधिकारी रेश्मा सौदागर, पोलिस हेडकॉन्स्टेबल रवींद्र काळे, पोलिस नाईक शिरीष वाघ, दिगंबर पाठक, पोलिस अंमलदार चांगदेव बागूल यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT