Police sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime cases : पोलिसांवर दगडफेक करणारे सात अटकेत

प्‍लॉटवरुन दोन गटात तुंबळ हाणामारी सुरु असतांना वाद

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : प्‍लॉटवरुन दोन गटात तुंबळ हाणामारी सुरु असतांना वाद सोडविण्‍यासाठी गेलेल्या पोलिसांवरही जमावाने दगडफेक केल्याने दोन कर्मचारी जखमी झाले होते. या प्रकरणात सातजणांना अटक करण्यात आली असून त्‍यांना १० मार्च पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस. एस. छल्लानी यांनी बुधवारी (ता. आठ) दिले.

विनोद प्रेमचंद महतोले, संतोष माणिकचंद महतोले, धनराज प्रेमचंद महतोले, प्रविण माणिकचंद महतोले (सर्व रा. पीरबाजार, उस्‍मानपूरा), युनूस खान अहेमद खान, अफ्सर खान अहेमद खान (दोघे रा. प्रेम कॉम्‍प्‍लेक्स जवळ, उस्‍मानपुरा),

आकाश विलास गायकवाड (रा. शिवाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. प्रकरणात उपनिरीक्षक कौतीक गोरे यांनी फिर्याद‍ दिली. उस्‍मानपूरा पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. वरील आरोपींना न्‍यायालयात हजर करण्‍यात आले, त्यावेळी सहायक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी युक्तीवाद केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Updates : देवळाली कॅम्पमध्ये हायवा ट्रक बंगल्यात घुसला

Whatsapp Call Feature : इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

Video : ₹2,500,000,000 मध्ये बनलेल्या रणबीर-आलियाच्या आलिशान घराची झलक समोर ! असं आहे घराचं इंटिरियर

Health Tips: डाएट्‌सच्या फॅड मध्ये अडकलाय? "झिरो फिगरच्या प्रेमात पडण्यापूर्वी आधी फायदे तोटे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT