अटक sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime news : पाळण्यासाठी घेऊन गेलेल्या गाईंची परस्पर विक्री

आरोपीस अटक, भिवधानोरा, अगरवाडगाव परिसरातील प्रकार

सकाळ वृत्तसेवा

कायगाव : भिवधानोरा, अगरवाडगाव (ता. गंगापूर) परिसरातील गावरान गाईंना गोमुत्रासाठी तसेच पाळण्यासाठी नेऊन परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (ता.१०) उघडकीस आला असून या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात एका विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्या आरोपीस अटक करण्यात आली आहे.

याबाबत गंगापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अगरवाडगाव (ता.गंगापूर) येथील अरुण बबन वाघ यांनी १४ डिसेंबर २०२२ आपल्या मोबाईल वरील फेसबुकवर मी गावरान गाई पाळण्यासाठी तसेच गोमूत्रासाठी घेऊन जातो.

ज्यांना द्यायचे असेल त्यांनी संपर्क साधावा अशी पोस्ट बघितली. त्यानंतर वाघ यांनी त्या पोस्टवरील पोस्ट करता आदेश दत्तात्रेय कांदेकर (वय २१),रा.दहेगाव वाळकी ता. जि.नगर) या व्यक्तीशी संपर्क साधला. आदेशने माझ्याकडे गोशाळा असून, मी गायी सांभाळतो असा विश्वास वाघ यांना दिला. शेतकऱ्यांचा विश्वास बसावा यासाठी त्याने व्हिडिओ कॉल करून मंदिर आणि काही गायी दाखवल्या.

यावर विश्वास ठेवून अरुण वाघ, वैभव भाऊसाहेब म्हसरुप (दोघे.रा. अगरवाडगाव), विवेक भाऊसाहेब नवले (रा.गणेशवाडी) या तिन्ही शेतकऱ्यांनी त्यास गायी सांभाळण्यासाठी देण्याचे कबूल केले. आदेश पिकअप घेउन १६ डिसेंबर २०२२ रोजी अगरवाडगाव येथे आला. शेतकऱ्यांनी त्यांच्या ३ गायी आदेश कांडेकरच्या स्वाधीन केल्या. तीन महिन्यांचा काळ लोटल्यानंतर आपल्या गायींना पाहण्याची शेतकऱ्यांना इच्छा झाली. त्यांनी त्यासाठी आदेशला फोन केला.

मात्र आदेशने मोबाईल बंद करून टाकल्याने त्याचा संपर्क होत नव्हता. काही दिवसानंतर वाघ तसेच त्यांच्या मित्रांनी आपल्या गाईंना बघण्याचा हट्ट धरल्यानंतर तसेच गाईंना इतरत्र विकल्याच्या संशयावरून वाघ यांनी त्यास फोन केला असता आदेशाचा फोन बंद दाखवला. आपली फसवणूक झाली हे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशन येथे सोमवारी (ता.१०) एप्रिल २०२३ वाघ यांच्या फिर्यादीवरून आदेश कांदेकर यांच्या विरोधात कलम ४०६ नुसार गुन्हा दाखल केला.

यानंतर तपास करुन गंगापूर पोलिसांनी आदेश कांदेकर याने पुन्हा फेसबुक आकाउंड वरून नवीन नंबर वरून आमच्याकडे दत्तमंदिर आहे, गो शाळा आहे. ज्यांना कोणाला गाई सांभाळण्यास द्यायच्या असतील. त्यांनी आमच्याशी संपर्क साधून गाई सांभाळायला द्या, असे भावनिक आवाहन केले.

यानंतर गंगापूर भिवधानोरा, अगरवाडगाव परिसरातील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन फसवणूक केली. त्या शेतकरी लोकांनी गाई बघण्याचा हट्ट धरल्यावर त्याने फोन नंबर बंद केला. पुन्हा दुसरा नवीन फेसबुक आकाउंड उघडून पहिल्या सारखाच गो शाळेला गाई देण्याचा मेसेच केला.

या संतप्त शेतकऱ्यांनी तोच मेसेच पाहून दुसऱ्या नंबरवरून त्या फसवणूक करणाऱ्या कांदेकरला फोन केला. आम्हाला गो शाळेला गाय द्यायची इच्छा आहे. पण आम्ही आपल्या इलाख्यात गाई आणून देऊ शकत नाही. आपल्याला गंगापूर तालुक्यात यावे लागेल, असे सांगितले. तो व्यक्ती गायी घेण्यास ढोरेगाव येथे सोमवारी (ता.१०) रोजी सकाळी ११ च्या सुमारास आला.

यावेळी शेतकऱ्यांनी पकडून गंगापूर पोलिसांच्या हवाली केले. मंगळवारी (ता.११) पोलिसांनी आरोपीस कोर्टात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास प्रभारी पोलिस अधिकारी साईनाथ गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय पाखरे हे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, लहानपणीच पितृछत्र हरपलं, आईने कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT