news  sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime news: अल्पवयीन मुलीवर मुंबईला नेऊन अत्याचार करणाऱ्यास आरोपीस वीस वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

साक्षपुराव्यावरुन न्यायालयाने आरोपी महेश दळवी याला दोषी ठरवून पोक्सोच्या कलम ४ (२) अन्वये २० वर्षे सक्तमजुरी,

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला मुंबईला पळवून नेत तिच्यावर तब्बल महिनाभर अत्याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली ५५ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी ठोठावली.

महेश भाऊसाहेब दळवी (वय २०, रा. केकत जळगाव, डोणगाव ता. पैठण, ह. मु. चितेगाव ता. पैठण) असे आरोपीचे नाव आहे.

प्रकरणात १५ वर्षीय पीडितेच्या वडीलांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, २६ ऑगस्ट २०१९ रोजी पीडिता पैसे घेवून घरातून निघून गेली होती. प्रकरणात बिडकीन पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचा तपास सुरु असतांना पोलिसांनी पीडितेला मुंबई येथून ताब्यात घेतले.

पीडितेने दिलेल्या जबाबानूसार, घटनेच्या तीन महिन्यांपूर्वी पीडिता व आरोपी यांची ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले होते. त्यानंतर २६ ऑगस्ट २०१९ रोजी पळून जावून लग्न करायचे आहे, म्हणून दोघे मुंबईला आले. घाटकोपर येथे एका रुमवर ठेवले व लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर बळजबरी महिनाभर अत्याचार केला.

पीडितेची माहिती मिळताच २८ सप्टेंबर २०१९ रोजी पोलिसांनी पीडितेला ताब्यात घेतले. न्यायालयात सहायक सरकारी लोकाभियोक्ता ज्ञानेश्वरी नागुला- डोली यांनी १० साक्षीदारांचे जबाब नोंदवले.

साक्षपुराव्यावरुन न्यायालयाने आरोपी महेश दळवी याला दोषी ठरवून पोक्सोच्या कलम ४ (२) अन्वये २० वर्षे सक्तमजुरी, २५ हजार रुपयांचा दंड, कलम ८ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी, ५ हजार रुपये दंड, भादंवी कलम ३७६ (२) अन्वये १० वर्षे सक्तमजुरी, २० हजार रुपये दंड, कलम ३६३ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी, ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात तपास अधिकारी तत्कालीन उपनिरीक्षक एस. एन. चव्हाण यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस अंमलदार सनी खरात आणि महिला पोलिस शिपाई एस.जी. घुगे यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT