crime sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime news : भर रस्त्यात मारहाण करुन विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या तिघांना पोलिस कोठडी

न्यायालयात सहायक सरकारी वकील किशोर जाधव यांनी युक्तीवाद केला.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : भर रस्त्यात मारहाण करुन विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या तिघा आरोपींना शनिवार (ता. २९) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथमवर्ग न्‍यायदंडाधिकारी आर.व्ही. सपाटे यांनी गुरुवारी (ता. २७) दिले.

शेख गयाज ऊर्फ बब्बू शेख रियाज (३०, रा. फुलेनगर, उस्मानपुरा), सोफीयान खान मुसा खान (२१, रा. आसेफिया कॉलनी) आणि नदीम खान फिरोज खान (२१, रा. मकबरा रोड, बेगमपुरा) अशी आरोपींची नावे आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील एक मुलगी तिच्‍या दोन मित्रांसोबतल बीबी-का-मकबरा पाहण्यासाठी गेली होती. तेथे आधीपासून असलेल्या टवाळखोरांची तिच्यावर नजर गेली.

दरम्यान, तिच्यासोबत असलेला मित्रांचा आणि ती वेगवेगळ्या धर्माचे असल्याचा त्यांना संशय आला. त्यामुळे टवाळखोरांनी तरुणीला इतर समाजाच्या मुलासोबत का फिरते म्हणून तिला शिवीगाळ करुन मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी स्वत: फिर्यादी होत बेगमपुरा पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल केलेला.

न्यायालयात सहायक सरकारी वकील किशोर जाधव यांनी युक्तीवाद केला. शहरात दंगलीच्‍या पार्श्‍वभूमीवर कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण झालेला असतांना आरोपींनी दोन गटात तेढ निर्माण होईल असे कृत्‍य केलेले आहे. पीडित तरुणीला शिवीगाळ, मारहाण करुन आरोपींनी तिची छेड काढली आहे. गुन्‍ह्यात आरोपींच्‍या साथीदारांना अटक करायची आहे. गुन्‍ह्यात आरोपींना प्रत्‍यक्ष, अप्रत्यक्ष कोणी मदत केली काय याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT