Kidnaping
Kidnaping esakal
छत्रपती संभाजीनगर

Crime news : उद्योजकाच्या मुलीचा अपहरणाचा प्रयत्न फसला, रिक्षाचालकाला चोप

सकाळ वृत्तसेवा

वाळूजमहानगर : वाळूज औद्योगिक वसाहतीतील एका उद्योजकाच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून घेऊन जाताना तिने मदतीसाठी आरडा ओरड केली. हा प्रकार काही दक्ष नागरिकांच्या लक्षात आला आणि त्यांनी तात्काळ रिक्षा अडवून चालकाला बेदम चोप दिला. हा सिनेस्टाईल प्रकार वाळूज औद्योगिक वसाहतीत बुधवारी (ता.१२) ११ वाजेच्या सुमारास घडला.

वाळूज औद्योगिक वसाहतीत एका उद्योजकाची १७ वर्षीय मुलगी बुधवारी (ता.१२) बजाजनगर येथील स्टरलाइट कंपनी समोरून रांजणगाव येथे जाण्यासाठी रिक्षा (एम एच २०, ईएफ-५५४१) मध्ये बसली. ती ज्यावेळी रिक्षात बसली त्यावेळी रिक्षात अन्य कोणीही प्रवासी नव्हते. पीडित मुलगी रिक्षात बसल्यानंतर आरोपी चालकाने ही रिक्षा भरधाव वेगात चालवून जोगेश्वरीकडे नेली.

यावेळी पीडित मुलीने त्याला थांब, थांब असे सांगूनही तो रिक्षा भरधाव चालवतच राहिला. त्यामुळे पीडित मुलीने मदतीसाठी आरडाओरड केली. दरम्यान रस्त्यातीलच एका कंपनीसमोर काही कामगार उभे होते. तिच्या ओरडण्याचा आवाज येताच त्यांनी मदतीसाठी धावपळ करत रिक्षा अडवली. तिने सांगितलेल्या आपबितीचा प्रकार भयानक असल्याचे लक्षात येताच त्यांनी रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच (११२) पोलीस व्हॅन घटनास्थळी आली. मात्र, तोपर्यंत आरोपी रिक्षा सोडून फरार झाला होता. पीडित मुलीला मदतीचा हात देत रिक्षा ताब्यात घेऊन पोलीस ठाणे गाठले. चित्रपटाच्या कथानकाला साजेशा या घटनेमुळे वाळूज औद्योगिक परिसरात खळबळ उडाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Unseasonal Rain : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला इशारा! जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपिटीची शक्यता

Loksabha Election 2024 : पाचव्या टप्प्यात मुंबई बनणार ‘रणभूमी’; पंतप्रधानांचा रोड शो आणि सभांचे नियोजन

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 मे 2024

अग्रलेख : कोसळणारे भ्रष्ट मनोरे...

Water Storage : राज्यात केवळ २५ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT