पोलिस कोठडी
पोलिस कोठडी Sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime News : गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरला पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : वाळूज परिसरात फिरते गर्भलिंग निदान चालवण्याऱ्या टोळीतील एका वैद्यकिय अधिकाऱ्याला वाळूज पोलिसांनी शुक्रवारी (ता. दोन) बेड्या ठोकल्या. सुनिल हरिशचंद्र राजपुत (वय ४४, रा. टी.व्ही. सेंटर रोड) असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. त्याला ५ जून पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश गंगापूर न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. वाय. वाघचौरे यांनी शनिवारी (ता. तीन) दिले.

वाळूज भागात डॉ. राजपूत हा गरोदर महिलांची अवैधरित्या गर्भलिंग निदान चाचणी करत असल्याची माहिती वाळूज ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी एका गर्भवती महिलेची मदत घेत डॉक्टराची भेट घेण्यास सांगीतले. त्यानंतर त्याने महिलेची गर्भलिंग निदान चाचणी करण्याची तयारी दर्शवली. शुक्रवारी (ता. दोन) वाळूजला चाचणी करण्यास येतो असे त्याने सांगितले. पोलिसांनी गंगापूरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन सापळा रचला.

त्यावेळी महिला ही पोलिसांनी सांगितल्या प्रमाणे एका घरात थांबलेली होती. काही वेळाने डॉ. राजपूत हा त्या महिलेच्या घरी गेला. त्यानंतर महिलेने पोलिसांना इशारा करताच दबा धरुन बसलेल्या पोलिसांच्या पथकाने छापा मारून डॉ. राजपूत याला अटक केली. या प्रकरणात गंगापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमेश पवारसह वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल धाबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला शनिवारी (ता. तीन) न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयात शासनातर्फे सहायक सरकारी वकील शशिकांत ईघारे, श्रीमती सदगुरे, आणि जावेद परकोटे यांनी युक्तीवाद केला. आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.

सिल्लोड येथे एसटीचा वर्धापनदिन साजरा

सिल्लोड : राज्य परिवहन महामंडळाच्या सिल्लोड आगारात एसटीचा अमृतमहोत्सवी वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगारप्रमुख शंकर स्वामी यांची उपस्थिती होती. ओरिसामध्ये घडलेल्या रेल्वेच्या दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहून नियोजित कार्यक्रमास फाटा देत प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. शहरातील भाग्यवान ऑप्टिकलच्या वतीने पंचाहत्तर तुळशीचे रोपटे भेट देण्यात आली. एसटीच्या कर्मचारी स्वाती बोराडे, अश्विनी सोनवणे यांनी आकर्षक रां

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT