kidnapping  
छत्रपती संभाजीनगर

Crime News : ''हमारे साथ चलो नही तो काट डालेंगे'' तरुणीचे भरदिवसा रिक्षातून अपहरण

जिन्सी पोलिसात गुन्हा एक संशयित ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मोंढा नाका परिसरातील एका स्पा सेंटरवर काम करणाऱ्या तरुणीला रस्त्यात अडवून शिवीगाळ करत तिचे रिक्षातून अपहरण केल्याची घटना शुक्रवारी (ता. २८) दुपारी घडली. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात अपहरणासह इतर कलमान्वये गुन्हा नोंदवला असून, एका संशयित आरोपीस ताब्यात घेतल्याची माहिती जिन्सीचे निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोंढा नाका परिसरात भिमसिंग नायक यांच्या मालकीचे अर्थ पार्लर स्पा सेंटर आहे. त्याठिकाणी स्वयमसिंग प्रविणकुमार सिंग हा तरुण व्यवस्थापक आहे. त्याच्याशिवाय ब्युटीशियन, हेल्पर असा पाच ते सहा मुलींचा स्टाफ आहे. या मुलींना सिंधी कॉलनी येथे राहण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यातील दोन मुली पार्लर शॉपमध्ये सकाळी १० वाजेच्या सुमारास आल्या.

त्यातील एका मुलीला सीमकार्ड घ्यायचे होते. त्यासाठी लागणारे आधारकार्ड तिच्या खोलीवरच विसरले. त्यामुळे श्री. स्वयमसिंग हा स्वत: मुलीला घेऊन खोलीवर गेले. त्याठिकाणी आधारकार्ड घेतल्यानंतर इतर चार मुली ॲटो रिक्षात आणि सोबतची मुलगी दुचाकीवर बसून शॉपवर येत असताना मोंढा नाका उड्डाणपुलाच्या खाली दोन जणांनी त्यांना रस्त्यात आडवले.

त्या दोघांनी ''हमारे साथ चलो नही तो काट डालेंगे'' असे म्हणून धमकावले. तोपर्यंत आणखी चारजण त्याठिकाणी आले. त्यांनी आमच्यासोबत चला म्हणून मारण्याची धमकी देऊ लागले. तेव्हा पाठीमागून इतर मुलींना घेऊन रिक्षाही थांबली. त्या रिक्षामध्ये दुचाकीवरील मुलीला बसवून शॉपच्या दिशेने पाठविले. नंतर शॉपच्या समोर रिक्षा थांबताच सहा ते सात जणांनी मागून त्याठिकाणी येत त्याच रिक्षात दुचाकीवरील मुलीला बसवून अपहरण केले.

घटनेची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर निरीक्षक अशोक केंद्रे, उपनिरीक्षक अनंता तांगडे यांच्यासह इतरांनी रिक्षा चालकाचा शोध घेऊन त्यास मुलीला ठाण्यात घेऊन येण्याच्या सूचना केल्या. मुलीला जिन्सी ठाण्यात आणल्यानंतर अपहरण करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक अश्फाक शेख करत आहेत. तरुणीचे अपहरण करणाऱ्या सहा ते सात जणांपैकी अरबाज जाकीर कुरेशी (वय २२, रा. सिल्लेखाना) यास जिन्सी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या भावात घसरण! सणासुदीत 10 ग्रॅमचा भाव किती? पाहा ताजा दर

America Car Culture : अमेरिकेत मर्सिडीज-बीएमडब्ल्यू पाहून श्रीमंत समजू नका! भारतीय तरुणाने सांगितलं धक्कादायक वास्तव, पाहा VIRAL VIDEO

Dusseldorf Ganeshotsav : ड्युसेलडॉर्फमध्ये गणरायाची भव्य मिरवणूक; ढोल-ताशांच्या गजरात रंगला मराठमोळा उत्सव

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत हिमांशू ढिल्लनला रौप्य, तर रुद्रांक्ष पाटीलला कांस्य पदक

IND vs WI, ODI: रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्ध घालणार धुमाकूळ? सचिन, डिविलियर्सचे विक्रम मोडण्याची संधी

SCROLL FOR NEXT