Atrocity case filed against former corporator for threatening to kill person by using caste abuse esakal
छत्रपती संभाजीनगर

Crime : कपाटाचे लॉक दुरुस्त करायला आला अन् दागिने चोरून गेला

चावी बनविणाऱ्या अनोळखी संशयिताविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : घरातील लॉक दुरुस्त करण्यासाठी आलेल्या कारागिराने त्याच कपाटातील तिजोरीतून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा ५३ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना एन-७, अयोध्यानगरात १६ जून रोजी दुपारी पावणेचार वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी चावी बनविणाऱ्या अनोळखी संशयिताविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार ती एन-७, अयोध्यानगर भागात राहते. दरम्यान राहत्या घरातील कपाटाचे लॉक दुरुस्त करण्यासाठी दोघा पती,पत्नींनी एका कारागिराला बोलाविले होते.

कारागीर कपाटाचे लॉक दुरुस्त करत असताना त्याने फिर्यादी महिलेच्या पतीची नजर चुकवून कपाटातील तिजोरीवर डल्ला मारला आणि तिजोरीतील २० हजारांची अंगठी, १६ हजारांचे गळ्यातील लॉकेट, चार हजारांच्या कानातील बाळ्या, दोन हजारांचे चांदीचे हातातील कडे, दोन भार वजनाच्या चौदाशे रुपयांच्या चांदीच्या बाहोट्या, रोख दहा हजार असा एकूण ५३ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास हवालदार तडवी हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: तुमचा EMI वाढणार? SBI च्या अहवालाने चिंता वाढवली; डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढल्यास किती वाढणार EMI?

अंगावर बिकिनी, त्यावर ओम-त्रिशूळ असलेला रॅप स्कर्ट, Kendall Jenner लूक पाहून नेटकरी संतापले

आधी माधुरी आणि आता 'इठा' मध्ये श्रद्धाने नेसल्या अमृताच्या ‘अमूल्य’च्या साड्या; किती आहे पैठणी आणि नऊवारीची किंमत?

Pune Court Attack: एकाच ठिकाणी राहतात म्हणून गोवलं, आरोपींच्या वकिलांचा कोर्टात दावा; आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! चिप्स, बिस्किटांसह खाद्यपदार्थांच्या पॅकेटवर दिसणार 'हा' इशारा

SCROLL FOR NEXT