crime sakal
छत्रपती संभाजीनगर

फोनवरून तलाक देणे आले अंगलट; पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा

एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : पत्नीशी फोनवर बोलत ‘तू मला आवडत नाहीस, माहेरहून घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये घेऊन ये, तरच घरात घेईन’ असे म्हणत पतीने तीन वेळेस तलाक म्हणत फोन ठेवला. या प्रकरणी पत्नीने पोलिसांत धाव घेत फिर्यादी दिल्याने छळ करणाऱ्या पतीसह दोन दीर, सासू, सासरे अशा पाच जणांविरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख अश्पाक शेख अन्वर (२६) असे त्या पतीचे नाव असून, सासू शरीफा शेख, सासरा अन्वर शेख, दीर फारुख शेख, शाहरुख शेख (सर्व रा. माणिकनगर, गल्ली क्र. ७, नारेगाव) अशी त्या संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी २२ वर्षीय पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह १५ सप्टेंबर २०१९ रोजी अश्पाकसोबत झाला होता. लग्नानंतर सहा महिने तिला चांगली वागणूक मिळाली. त्यानंतर मिस्त्री कामगार म्हणून काम करणाऱ्या पतीसह दीर, सासू, सासरे यांनी ‘घर बांधण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये, तेव्हाच घरात घेईन’ असे म्हणत वारंवार छळ करून घराबाहेर हाकलून दिले.

तेव्हापासून पिडीता माहेरी राहत होती. दरम्यानच्या काळात महिला भरोसा सेलमध्येही समझोता करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पतीसह सासरच्या मंडळींनी पोलिसांसमोर नरमाईची भूमिका घेतली, मात्र नंतर त्रास देणे सुरुच ठेवले. त्यावेळी तीन वेळेस घरच्यांच्या बैठकीही झाल्या. पिडीता माहेरी राहत असल्याने तिने पतीला आपणास नांदावयास घेऊन जा, सांगण्यासाठी फोन केला असता, पती अश्पाक याने ‘मला तू आवडत नाहीस’ म्हणत पैसे घेऊन ये, तेव्हाच घरात घेईन अशी भूमिका घेत पत्नीला तीन वेळेस तलाक, तलाक, तलाक म्हणत फोन ठेऊन दिला. या प्रकरणी पत्नीच्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास उपनिरीक्षक अबूज करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sibal on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह! कपिल सिब्बल स्पष्टच बोलले; "आता कोर्टात जाण्यात अर्थ नाही, विश्वास उडाला!"

Maharashtra Live News : पंतप्रधान मोदींनी नवरात्रीनिमित्त दिल्या शुभेच्छा

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

Navratri Festival : आदिमायेच्या उत्सवाला प्रारंभ;घटस्थापनेसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत मुहूर्त

Tuljabhavani Temple: तुळजापूरला नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण ;तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज घटस्थापना

SCROLL FOR NEXT