waqf board waqf board
छत्रपती संभाजीनगर

वक्फची जमीन हडपणाऱ्यांवर गुन्हे; बोर्डाच्या बैठकीतील निर्णय

या बैठकीत झालेल्या निर्णयाबाबत बैठकीच्या प्रभारी अध्यक्ष फौजिया खान यांनी दिली. त्यांनी सांगितले की, वक्फ बोर्डाला मॉडेल बोर्ड तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: ठाणे व जालना रस्ता येथील वक्फ बोर्डाच्या जमिनीवर इमारत बांधून त्या विक्री करण्यात आल्या. या दोन्ही प्रकरणांत संबंधित मुतवल्लीसह जमीन विक्री करणाऱ्यांवर गुन्हे नोंद करावे. तसेच राज्यात कोणत्याही जागेवर वक्फ बोर्डाच्या जमिनीवर अतिक्रमण होत असेल तर वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी ‘सुमोटो’ घेऊन संबंधित जमीन लाटणाऱ्यांवर गुन्हे नोंदवावेत. असे आदेश वक्फ बोर्डाच्या बैठकीत शुक्रवारी (ता.२५) वक्फ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
वक्फ बोर्डाची बैठक शुक्रवारी खासदार फौजिया खान यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

या बैठकीत झालेल्या निर्णयाबाबत बैठकीच्या प्रभारी अध्यक्ष फौजिया खान यांनी दिली. त्यांनी सांगितले की, वक्फ बोर्डाला मॉडेल बोर्ड तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात बोर्ड डिजिटायजेशन करण्यात येईल. तसेच कर्मचारी भरतीबाबतही शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. बैठकीत खासदार इम्तियाज जलील, आमदार वजाहत खान, वक्फ बोर्डाचे सदस्य एम. एम. शेख, मुद्दस्सीर लांबे, अॅड. ए. यू. पठाण यांच्यासह अन्य सदस्यांची उपस्थिती होती.

कारणे दाखवा नोटीस बजावणार
महापालिकेने आमखास मैदानाजवळील वक्फ बोडाची जागा परस्पर स्मार्ट सिटीला दिली. या प्रकरणाबाबत बोर्डात चर्चा करण्यात आली. वक्फ ट्रिब्युनलचा निर्णय वक्फ बोर्डाच्या बाजूने असतानाही महापालिकेने दाद दिली नाही. या प्रकरणात वक्फ बोर्डाच्या लिगल टीमला सदर प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश देण्यात आले असून ज्या वकिलांनी या प्रकरणात काम केले नाही. अशा वकिलांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT