2Sakal_20News_11 
छत्रपती संभाजीनगर

जनावरांना होणाऱ्या क्रिमियन कॉन्गो रोगामुळे मानवी आरोग्याला धोका !

दुर्गादास रणनवरे

औरंगाबाद : जनावरांत होणारा क्रिमियन कॉन्गो हेमोरॅजिक फिव्हर (सीसीएचएफ) या रोगाचा प्रादुर्भाव गुजरातमध्ये झाला आहे. जनावरांपासून माणसामध्ये होणारा या रोगापासून वाचण्यासाठी खबरदारी म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सुचना पशुसंवर्धन विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांनी राज्यातील सर्व प्रादेशिक सह आयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी तसेच सहायक आयुक्तांना दिल्या आहेत.

काय आहे सीसीएचएफ रोग ?
सीसीएचएफ हा जनावरांपासून माणसांमध्ये होणारा रोग असुन यापुर्वी कोंगो, चिन, हंगेरी, इराण, दक्षिण आफ्रिकेत यापुर्वी प्रादुर्भाव आढळुन आला होता. नैरो व्हायरस या विषाणूपासून हॅलोमा जातीच्या गोचीडापासून त्याचा एका जनावरातून दुसर्या जनावरात संसर्ग होतो. गाई म्हशी शेळ्या मेंढ्यामध्ये मुख्यत्वे आढळणाऱ्या या रोगात लक्षणे आढळून येत नाहीत.

बाधित जनावरांचे मास खाल्याने व त्यांच्या रक्ताच्या संपर्कात येणाऱ्यांना बाधा होण्याची शक्यता असते. माणसात या रोगाचा प्रसार घातक असुन बाधित व्यक्तींपैकी ३० टक्केपर्यंत व्यक्ती निदान उपचारापूर्वी दगावण्याची शक्यता असते. या विषाणुजन्य रोगाविरुद्ध प्रभावी उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या रोग अन्वेषन विभागाने कळवलेल्या पत्रात म्हटले आहे.

डोकेदुखीसह जास्त ताप येणे आदी लक्षणे
डोकेदुखी, जास्त ताप येणे, सांधेदुखी, पोटदुखी, उलटी होणे आदी लक्षणे दिसुन येतात. आजारी व्यक्तीचे डोळे लाल दिसतात. घशा तोंडाच्या वरच्या भागात लाल ठिपके दिसुन येतात. आजार बळावल्यास त्वचेखालील, नाकाखाली, लघवीतून रक्तस्त्राव तर काहींमध्ये कावीळची लक्षणे दिसुन येतात. प्रामुख्याने व्यावसायिक कारणांनी पशुंच्या संपर्कात येणारे पशुपालक, कामगार, कत्तलखाण्यातील व्यक्तींमध्ये लक्षणे दिसुन येतात.

पशुपालक व पशुंच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. सध्या जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव नसल्याने घाबरुन न जाता पशु, गोठे यांची स्वच्छता नियमित करावी. गोचीड व किटक निर्मुलनावर भर द्यावा. तसेच या रोगाची लक्षणे दिसल्यास तत्काळ पशुधन विभागाला माहीती कळवावी असे आवाहन पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने यांनी केले आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Administrative Reshuffle : प्रशासनात मोठा भूकंप! १५ IAS अधिकाऱ्यांसह ३८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा कोणाची कुठे झाली रवानगी?

IND vs WI, 3rd ODI: केएल राहुलचं क्लासिकल शतक! रोहित-ऋतुराजची अर्धशतकं; भारताने वेस्ट इंडिजसमोर उभा केला धावांचा डोंगर

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Latest Marathi News Live Update : गांधी जयंतीपासून रोजगार सेवकाचे कामबंद आंदोलन

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

SCROLL FOR NEXT