शेतकऱ्यांनो, पीक विम्याची संधी गमावू नका
जिल्ह्यातील १०,३४७ अपात्र अर्जांची होणार फेरतपासणी
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. २७ : खरीप हंगाम २०२५ मधील प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरलेल्या जिल्ह्यातील १० हजार ३४७ शेतकऱ्यांच्या अर्जांची फेरतपासणी करण्यात येणार आहे. यासाठी बुधवारपासून (ता. २८) ५ नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, संबंधित शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे मुदतीत जमा करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सागर खटकाळे यांनी केले आहे.
ग्रामपंचायतीत मिळणार त्रुटींची माहिती
अपात्र शेतकऱ्यांची यादी आणि अर्जांतील त्रुटींची माहिती संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात सहायक कृषी अधिकाऱ्यांमार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे. शेतकऱ्यांनी यादी तपासून त्रुटींनुसार कागदपत्रे सादर करावीत. नावात तफावत असल्यास आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा व आठ-अ उतारा द्यावा. संयुक्त जमिनीसाठी सहखातेदारांचे संमतीपत्र, तर भाडेकरू शेतकऱ्यांनी वैध भाडेकराराचा पुरावा सादर करावा. अल्पवयीन अर्जदारांसाठी पालकांचे प्रतिज्ञापत्र, तसेच सर्व्हे क्रमांकातील चुका किंवा अस्पष्ट सातबारा उताऱ्यांसाठी सुधारित महसुली कागदपत्रे आवश्यक आहेत.
बँक खाते पडताळणीही आवश्यक
दरम्यान, बँक खाते पडताळणीअभावी २७४ शेतकऱ्यांची विमा भरपाई प्रलंबित असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आधार कार्ड व पासबुकासह ‘प्रपत्र अ’ सादर करावे. अर्जदाराचा मृत्यू झाल्यास मृत्यू प्रमाणपत्र आणि वारस प्रमाणपत्रासह ‘प्रपत्र ब’ भरून द्यावे. शेतकऱ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज ५ नोव्हेंबरपर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करावेत. अधिक माहितीसाठी गावातील सहायक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.