छत्रपती संभाजीनगर

कर्जमाफीची घोषणा केवळ नावालाच

CD
दोन महिने उलटूनही पीककर्ज मिळेना ---- दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची आर्थिक अडचण, बँकांमध्ये वाढत्या चकरा जळकोट शहर,ता.१२ : राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाला दोन महिन्यांहून अधिक कालावधी लोटला आहे. मात्र, इतका वेळ उलटूनही या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप कागदावरच अडकल्याने शेतकरी नाराज आहेत. त्यातच पीककर्जही मिळत शेतकरी त्रस्त झाले आहेत. शासनाने काही महिन्यांपूर्वी संकटग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी ही कर्जमाफी जाहीर केली होती. या घोषणेमुळे हवालदिल झालेला शेतकरी वर्ग आगामी शेती हंगामासाठी नव्याने कर्ज मिळवण्यास पात्र ठरेल आणि त्याला मोठा आधार मिळेल, अशी आशा निर्माण झाली होती, परंतु, बँकेच्या वारंवार फेऱ्या मारूनही प्रत्यक्षात कोणताही लाभ शेतकऱ्यांच्या पदरी पडलेला नाही. पात्र शेतकऱ्यांच्या अंतिम याद्याच अजून जाहीर झालेल्या नाहीत, तर ज्या भागांत याद्या आल्या आहेत तिथे बँकांकडून वेगवेगळ्या तांत्रिक कारणांचा दाखला देत शेतकऱ्यांना ताटकळत ठेवले जात आहे. नाइलाजाने शेतकऱ्यांना पुन्हा खासगी सावकारांच्या दारात जावे लागत आहे. यंत्रणेतील समन्वयाच्या अभावामुळे आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मूळ पात्र घटकांपर्यंत पोहोचत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. रब्बी हंगामातील पेरणीही कठीण यंदा पाऊस नसल्याने खरीप हंगाम हातातून गेला आहे. तर आर्थिक अडचणींमुळे बियाणे, खते, शेतीच्या कामांसाठी जवळ पैसाच नसल्याने रब्बीची पेरणी करणेही कठीण आहे. त्यामुळे शासनाने तातडीने कर्जवाटप करण्याच्या सूचना बँकांना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

Successful Investment: बाबो! ही महिला चक्क पार्किंगमधून कमावते लाखो रुपये; नेमका काय आहे बिझनेस?

अंतराळात तयार होणार स्कॉच व्हिस्की! कुणाला प्यायला मिळणार? ‘स्पेस पफिन’ मिशन नेमकं काय?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

FDA Action: खाद्यतेलाच्या साठ्यांवर छापा, 'एफडीए'च्या कारवाईत १.२८ कोटींचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT