छत्रपती संभाजीनगर

अखेर महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कारभाराला प्रादेशिक व्यवस्थापकांचा दणका! पीक कर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती; वरिष्ठांचे आदेश डावलल्याने कारवाईकडे लक्ष ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल; कळंब शाखेत प्रादेशिक व्यवस्थापकांची धडक

CD
((सकाळ इम्पॅक्ट)) ....................................... पीककर्जातील दिरंगाईची झाडाझडती संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू कळंब, ता. २८ (बातमीदार) : दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीककर्जासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कळंब शाखेत वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध वरिष्ठांनी तत्काळ दखल घेतली. प्रादेशिक व्यवस्थापक पद्मसिंह पाटील यांनी बुधवारी (ता. २८) शहरातील शाखेला भेट देत संबंधित कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. तसेच रखडलेली कर्जप्रकरणे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी सहायक व्यवस्थापक रूपेश झांबरकर यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती बँकेचे महाव्यवस्थापक महेश कावेरी यांनी दिली. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहेत. खरीप हंगामातील नुकसान आणि उत्पन्नातील घट यामुळे त्यांच्यावरील आर्थिक भार वाढला आहे. अशा परिस्थितीत पीककर्ज वेळेत मिळणे अपेक्षित असताना, शाखाधिकारी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून शेतकऱ्यांना वारंवार बँकेत चकरा माराव्या लागत होत्या. आवश्यक कागदपत्रे सादर करूनही कर्जवाटपासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. वरिष्ठांकडून निर्देश देऊनही कर्जवाटपात दिरंगाई होत असल्याचा मुद्दा गंभीर बनला होता. शाखेतील कारभार आणि पीककर्जासाठी होणारी शेतकऱ्यांची हेळसांड याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर प्रादेशिक व्यवस्थापक पाटील यांनी शाखेला भेट देऊन कर्मचाऱ्यांना जाब विचारला. तसेच उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तात्पुरत्या स्वरूपात शाखाधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना पीककर्ज वाटपाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. ........................ ((चौकट)) ‘शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक द्या’ बँकेत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी, कर्जवाटपाची प्रक्रिया विनाकारण लांबवू नये, अशा स्पष्ट सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या सहायक व्यवस्थापक झांबरकर यांची नोंद घेण्यात आली असून, त्यांच्यावरील कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे महाव्यवस्थापक महेश कावेरी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC election results: चार राज्यांतील 28 जागांपैकी काँग्रेसच्या वाट्याला एकही नाही; सत्ता असूनही कर्नाटकात काँग्रेसची धूळधाण

Pune News : शिक्षकांच्या प्रश्नांसाठी प्राधान्याने काम करणार, टीकेला कामातून उत्तर देणार; कौस्तुभ गावडे यांची ग्वाही

अमरावती शिक्षक मतदारसंघाचा निकाल जाहीर! किरण सरनाईक सलग दुसऱ्यांदा विजयी, काँग्रेसच्या अदिती पोहरेंचा पराभव

Marathi News Live Updates : पुण्यात बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणात मोठी कारवाई; १३ पोलिसांसह २५ जण अटकेत!

Spain Train Accident: स्पेनमध्ये भीषण अपघात; २ हाय-स्पीड रेल्वेगाड्यांची धडक; ३० जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT